Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; संजय राऊत यांनी सांगितले खास गणित...

विधानसभा निवडणुकीनंतर आता लवकरच राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. मात्र या निवडणुकांची घोषणा होण्याआधीच शिवसेनेच्या ठाकरे गटाने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. आज पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी मुंबई स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा रेटा असल्याचे स्पष्ट केले.

Sanjay Raut

काय म्हणाले संजय राऊत

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला. भाजपसोबत होतो त्यावेळीही आम्ही मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढली असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या विधानसभेतही मुंबईतील जागा जास्त मिळाल्या असत्या तर आम्ही जिंकल्या असत्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत शिवसेनेची ताकद चांगली आहे. कार्यकर्त्यांचाही स्वबळावर लढण्याचा रेटा आहे, असे राऊत यांनी सांगितले.

मुंबई महत्त्वाची

संजय राऊत म्हणाले, मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागणार आहे. ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे, ते म्हणाले. महाविकास आघडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवणार का? असा सवाल केल्यावर त्यांनी हे उत्तर दिले. त्यांनी याविषयीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असे सांगीतले. पण त्यांनी पालिका निवडणूक एकटी लढवण्याचे थेट संकेत दिले आहेत.

मुंबईचे तुकडे होऊ देणार नाही

मुंबईचे तुकडे होऊ द्यायचे नसतील तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला ही निवडणूक जिंकावीच लागणार असे ते म्हणाले. ईव्हीएमने सगळ्यांचे निकाल लागले. महापालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांचे मनोबल जाणून घेण्यासाठी आज बैठका आहेत. चिंतन मनन करण्यापेक्षा आता पुढे गेले पाहिजे. गेल्या 70 वर्षात अशा निवडणूका पहिल्या नाहीत. ज्यांनी आम्हाला मतदान केलं मात्र ते आम्हांला मिळालं नाही, असा लोकांना पक्ष बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीसाठी पुणे दौऱ्यावर आल्याचे त्यांनी सांगीतले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+