मुंबई लोकल प्रवाशांसाठी गुड न्यूज! मध्य रेल्वेने आणली 'लकी यात्री योजना', दररोज कमवा 10 हजार
What is the Lucky Yatri Scheme of Central Railway : मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकल ट्रेनला ओळखले जाते. रोज लाखोंच्या संख्येने लोकलने प्रवास केला जातो. लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण, मध्य रेल्वेने आता "लकी यात्री योजना" आणली आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रवाशांना रोज 10 हजार रुपये आणि आठवड्याला 50 हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. विशेष बाब म्हणजे ही योजना अवघे आठ आठवडे चालणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. चला तर जाणून घेऊया ही योजना नेमकी काय आहे. कशी काम करणार आहे.
काय आहे लकी यात्री योजना?
लकी प्रवासी योजना अत्यंत सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. प्रत्येक दिवशी एका प्रवाशाची निवड अशा पद्धतीने ही योजना रेल्वे स्थानकांवर राबवली जाणार आहे. तिकिट चेकर म्हणजेच तिकीट तपासणी अधिकारी लकी प्रवाशाची निवड करुन त्याचं तिकीट किंवा पास तपासणार आहेत. त्यातील एकाची दररोज निवड केली जाणार आहे.

विनातिकीट प्रवास करणारे किती टक्के?
मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला साधारण 10 ते 20 टक्के प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्यांना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर तिकिट किंवा पास काढावा यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही योजना आणण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
दिवसाला 10 तर आठवड्याला 50 हजारांचे बक्षीस!
टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले. त्यानुसार, रोज एका प्रवाशाला 10 हजारांचं बक्षीस मिळणार आहे. तर आठवड्यातून एका प्रवाशाला 50 हजारांचं बक्षीस मिळणार आहे. मध्य रेल्वेने आणलेल्या या योजनेमुळे प्रवाशांची चांदीच चांदी होणार आहे. यामध्ये प्रवाशांकडून देखील आनंद व्यक्त केला जातोय. तर विनाप्रवास करणाऱ्यांवर देखील यातून चोप बसेल, अशी आशा रेल्वे प्रशासनला आहे.
मध्य रेल्वेने ही योजना नेमकी कोणासाठी आणली?
सर्वसामान्य तिकिटधारक आणि पास धारक यांच्यासाठी ही योजना खुली आहे. यासाठी कोणत्याही श्रेणीतला पास किंवा तिकिट असलं तरीही चालणार आहे. लकी प्रवासी ठरलेल्या व्यक्तीला कुठलंही अतिरिक्त शुल्क न भरता बक्षीस मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार रोज सुमारे 40 लाख प्रवासी ट्रेनने प्रवास करतात.
त्यापैकी 20 टक्के प्रवासी विनातिकिट वा पास न घेता प्रवास करतात. तिकिट तपासणीमध्ये रोज विविध स्थानकांवर सुमारे 4 ते 5 हजार प्रवासी पकडले जातात. अधिकाधिक लोकांनी तिकिट काढलं पाहिजे किंवा पास काढला पाहिजे आणि मगच प्रवास केला पाहिजे यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. ही योजना आगामी आठ आठवडे म्हणजे दोन महिने चालणार आहे.












Click it and Unblock the Notifications