Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mumbai local train : मुंबईकरांसाठी खूशखबर, लोकल ट्रेन आणखी फास्ट धावणार! स्पीडबाबत मोठा निर्णय

Mumbai local train news : मुंबई लोकल प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेने गाड्यांची वेगमर्यादा हटवली आहे, त्यामुळे आता लोकल ट्रेन आणखी जलदरित्या धावणार असून यामुळे मुंबईकरांचा मोठा फायदा होणार आहे, मुंबई लोकलसंदर्भात जे-जे चांगले करता येईल ते-ते करण्याचे काम रेल्वे विभाग करत आहेत. खास बाब म्हणजे गेल्या दोन वर्षात 15 ठिकाणांची वेगमर्यादा काढून टाकण्यात आली आहे.

मुंबई लोकल.. मुंबईकरांचा श्वास मुंबईकरांची जीवनवाहिनीच. मुंबईत कुठेही फिरा लोकल शिवाय पर्याय नाही रस्ता आणि त्यावरील वाहतूक ही मोठी समस्या त्यामुळे तासंतास ट्राफिकमध्ये अडकणाऱ्या वाहनधारकांना आणि प्रवाशांना लोकल ही कधीही सुकर आणि वेळेत इच्छीतस्थळी नेऊन सोडणारी सेवा.. त्यामुळे लोकलला मुंबईत खूप महत्त्व आहे, आता मुंबई लोकलचा वेग वाढणार असल्याने ही मुंबईकरांसाठी मोठी आणि वेळ वाचवणारी बाब ठरणार आहे.

Mumbai local train news

रेल्वेचे काही प्रकल्प, पुलांचे बांधकाम, दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामे पूर्ण झाल्यानंतर आता वेगमर्यादा हटवण्यासंदर्भात हा मोठा बदल केला जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, सुरक्षिततेच्या कारणास्तव या प्रकल्पाच्या कामांदरम्यान लोकल गाड्यांचा वेग कमी करावा लागला होता, आता काम पूर्ण झाल्यानंतर ही वेग मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढवता येईल.

रेल्वेचे 'हे' झाले काम फत्ते..

ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यानचे पूल क्रमांक 5 आणि 61 तसेच कांदिवली जवळील पूल क्रमांक 20 पुन्हा बांधण्यात आले आहेत, हे जुने ब्रिटिशकालीन स्क्रू -ब्रिज काढून टाकण्यात आले आहेत आणि त्याऐवजी नवीन आरसीसी पूल तयार करण्यात आले आहेत, त्यामुळे रेल्वे वाहतूक अजून सुरक्षित झाली असून लोकल गाड्यांचा वेळ वाढणार आहे.

ऑक्टोंबर 2000 पासून गोरेगाव आणि कांदवली या लोहमार्गादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी लावण्यात आलेली वेगमर्यादा आता काम पूर्ण झाल्यानंतर काढून टाकण्यात आली आहे तसेच वांद्रे टर्मिनसला जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाडी आता पाचवी आणि सहाव्या मार्गावर चालवल्या जात आहेत, त्यामुळे मेल एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांचे वेळापत्रक सुधारले आहे.

पश्चिम रेल्वेची वेगवान भरारी: लोकल गाड्या 95 टक्के वेळेवर

पश्चिम रेल्वेने केलेल्या प्रयत्नांमुळे आता त्यांच्या 95 टक्के गाड्या वेळेवर धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून वेग मर्यादा हटवल्यामुळे लोकल गाड्यांचा वेग लक्षणीयरीत्या वाढला असून, प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे.

वेग मर्यादा हटवल्याचा परिणाम

पश्चिम रेल्वेने विविध भागांमधून वेग मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे गाड्यांचा वेग वाढला. यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत झाली.

एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत खालील ठिकाणाहून वेग मर्यादा काढण्यात आल्या..

  • खार-सांताक्रूझ (60 किमी/तास)
  • सांताक्रूझ-विलेपार्ले (75 किमी/तास)
  • सांताक्रूझ-खार (75 किमी/तास आणि 60 किमी/तास)

एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत वेग मर्यादा हटवलेली ठिकाणे:

  • माटुंगा रोड-माहीम (पाचवी लाईन) (15 किमी, 50 किमी आणि 15 किमी/तास)
  • माहीम-वांद्रे (पाचवी लाईन) (30 किमी आणि 10 किमी/तास)
  • वांद्रे टर्मिनस ते सांताक्रूझ (45 किमी आणि 45 किमी/तास)
  • अंधेरी यार्ड परिसर (50 किमी/तास)
  • सांताक्रूझ ते वांद्रे (75 किमी/तास)
  • वांद्रे-माहीम (15 किमी/तास)
  • जोगेश्वरी-गोरेगाव (55 किमी/तास)

या बदलांमुळे मुंबई लोकल प्रवाशांचा प्रवास आता अधिक जलद आणि आरामदायी होईल. रेल्वे विभागाने घेतलेला हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+