मुंबईला हादरवणाऱ्या लोकल स्फोटातील 12 आरोपींची निर्दोष मुक्तता - हायकोर्टाचा निर्णय सविस्तर वाचा
Mumbai local bomb blast : मुंबईतील लोकल रेल्वे बॉम्बस्फोटामध्ये 189 लोकांचा बळी घेणाऱ्या प्रकरणात आज सर्व 12 आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 11 जुलै 2006 रोजी मुंबईतील विविध वेगवेगळ्या लोकल ट्रेनमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते, या बॉम्बस्फोटामध्ये प्रचंड प्रमाणात जीवित हानी झाली होती. यापुर्वी कनिष्ठ न्यायालयाने १२ आरोपींना शिक्षा सुनावली होती, आता हा निर्णय रद्दबातल ठरला आहे.

मुंबईतील जनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेमध्ये 11 जुलै 2006 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 189 लोकांचा मृत्यू झाला तर 800 लोक जखमी झाले होते. त्यानंतर आज 19 वर्षांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला आहे. त्यामध्ये सर्व 12 जणांची निर्दोष मुक्ता केली आहे. दरम्यान 2015 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने बारा आरोपींना या प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यापैकी पाच जणांना मृत्यू दंड आणि इतरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
काय म्हणाले उच्च न्यायालय?
एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द करत हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे की, आरोपी विरुद्ध खटला सिद्ध करण्यात सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आरोपींनी गुन्हा केला आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे म्हणून त्यांचे शिक्षा रद्द करण्यात येत आहे, असं खंडपीठाने स्पष्ट केलं, न्यायालयाने म्हटलं आहे की, जर आरोपी इतर कोणत्याही प्रकरणात हवा नसेल तर त्यांना तुरुंगातून सोडून देण्यात येईल.
आरोपींच्या जप्त वस्तू स्फोटाशी संबंधीत नाहीत
न्यायालयाने असे म्हटले आहे की, तपासादरम्यान जप्त केलेली स्फोटकं, शस्त्र आणि नकाशे स्फोटाशी संबंधित नसल्याचा दिसून आले आहे. स्फोटामध्ये कोणत्या प्रकारचे बॉम्ब वापरले गेले हे सिद्ध होऊ शकले नाही.
कसा आणि कुठे घडला होता बाॅम्बस्फोट?
2006 रोजी मुंबई मधील विविध बॉम्बस्फोटासाठी रिकेड प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला होता. पहिला बॉम्बस्फोट संध्याकाळी सहा वाजून 24 मिनिटांनी झाला होता कामावरून परतणार्या लोकांच्या गर्दीच्या वेळी हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता, तर शेवटचा बॉम्बस्फोट सहा वाजून 35 मिनिटांनी घडवण्यात आला होता. चर्चगेटहून येणाऱ्या गाड्यांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यामध्ये हेबॉम्ब ठेवण्यात आले होते. माटुंगा रोड -माहीम जंक्शन -वांद्रे -खार रोड -जोगेश्वरी- भाईंदर आणि बोरिवली स्थानकाजवळ हे स्फोट झाले होते.
यांची मुक्तता होणार
2015 मध्ये ट्रायल कोर्टाने बॉम्बस्फोट प्रकरणात 12 जणांना दोषी ठरवलं होतं. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या विशेष कोर्टाने संशयित आरोपी फैसल शेख, आसिफ खान, कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दुकी आणि नवीद खान यांना फाशीची शिक्षा सुनावली. इतर सात दोषी मोहम्मद साजिद अन्सारी, मोहम्मद अली, डॉ. तनवीर अन्सारी, माजिद शफी, मुझ्झम्मिल शेख, सोहेल शेख आणि झमीर शेख यांना कटात सहभागी असल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आता ही शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली असून बाराही आरोपींची मुक्त केली आहे












Click it and Unblock the Notifications