Mumbai Local : सर्वच लोकल ट्रेन होणार एसी! पण कधी होणार? काय म्हणाले CM देवेंद्र फडणवीस, जाणून घ्या
Mumbai Local All trains will be AC : मुंबईमध्ये मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान लोकलमधून पडून चार प्रवाशांचे जीव गेला. कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून या प्रवाशांचा मृत्यू झाला. तर जखमींमध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. 9 जून 2025 रोजी सकाळी 9.20 वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
या घटनेनंतर राज्यात संताप व्यक्त झाला असून राज्य शासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून मध्य रेल्वेही या घटनेनंतर अशा घटना घडू नयेत, यासाठी दक्षता घेत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सर्व लोकल गाड्या एसी होतील असे त्याच दिवशी म्हटले होते, आता हा मुद्दा पुढे गेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

राज्य शासनाने मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार, उपनगरीय गाड्यांच्या भाड्यात एसी सेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर होत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. तसेच गाड्यांना होणारी गर्दी पाहता कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत लोकल वाहतूक क्षमता वाढवण्याचे प्रयत्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतील लोकल वाहतूक क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील हे सांगितले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी आपण चर्चा केली असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कृती आराखडा तयार केल्याचे सांगितले तसेच लोकल प्रवाशांना एसी गाड्या साध्या दरातच देण्याचे ते नियोजन करत असल्याचे म्हणाले.
कार्यालयीन वेळेत बदलाच्या सूचना
प्राप्त माहितीनुसार, सकाळी आणि सायंकाळच्यावेळी ठाराविक वेळेत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते, या पीक अवरमधील गर्दी टाळण्यासाठी प्रयत्नांचा भाग म्हणून शासकीय आणि खासगी कार्यालयाच्या वेळा बदलाव्यात अशा सूचना याआधीच दिलेल्या होत्या, त्यामुळे शासकीय कार्यालयं या गोष्टींचे पालन करत आहेत, खासगी कार्यालयांशी यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेऊ असेही त्यांनी म्हटले आहे.
कसा घडला होता अपघात?
दोन लोकल गाड्या परस्परविरुद्ध दिशेने येत होत्या, त्यावेळी लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या लोकलला घासले गेले. या अपघातस्थळादरम्यान लोकल गाड्यांचे ट्रॅकही जवळ असल्याचे बोलले जात आहे, त्यातून हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
ठाण्यातील आयटी इंजिनिअरचा तो शेवटचा प्रवास ठरला
रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या चार जणांपैकी ठाण्यातील एका 44 वर्षीय आयटी इंजिनिअरचा देखील समावेश आहे. मयूर शाह असे मृत व्यक्तीचे नाव आहे. डोंबिवलीत स्वप्नातील घर घेण्यासाठी निघालेल्या मयूरचा हात सटकला आणि दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या निधनाने स्वप्नातील घराचा चुराडा झाला तर आईचा आधारही संपला. तर या अपघाताने दोन बहीणी भावाच्या प्रेमापासून मुकल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications