Accident News : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चौघांवर काळाचा घाला, कसा घडला थरार?
Mumbai Kolkata National Highway Bhandara Accident news : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा या ठिकाणी भीषण अपघाताची घटना घडली आहे. बोलोरो अन् ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना नेमकी कुठे व किती वाजता घडली व अपघात नेमका कसा झाला, याविषयी जाणून घेऊया..!
मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करत होते. भंडारा महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेल समोर रविवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. त्यामुळे या भागात वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रूग्णालयात दाखल केले. तर मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

नेमका कसा घडला अपघात?
बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे. अशोक फुलचंद डेहरवाल, शैलेंद्र लेखाराम बघेले, शैलेश पन्नालाल गोकुळपुरे, मुकेश बिंजेवार या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अविनाश नाकतोडे जखमी आहे.
MPत भरधाव कार विहिरीत पडली, 12 लोक ठार
मध्य प्रदेशातील मंदसौरमधून चकारिया गावात एक भीषण अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर कार थेट विहिरीत कोसळली. या घटनेत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी आहे.
#WATCH | Mandsaur, Madhya Pradesh: A van carrying several people plunged into a well; rescue operation underway. pic.twitter.com/PQQiK4P30J
— ANI (@ANI) April 27, 2025
अपघातग्रस्त इको व्हॅन गॅसवर चालत होती, त्यामुळे विहिरीत पडल्यानंतर त्यातून गॅस गळती सुरू झाली. यामुळे बचावकार्यात अडचणी आल्या.
गॅसमुळे गुदमरुन गाडीतील पुरुष आणि महिला वेदनेने तडफडू लागल्या. घटनास्थळी गोंधळ उडाला. यादरम्यान, एका स्थानिक तरुणाने कारमधील जखमींना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली, परंतु गॅस गळतीमुळे गुदमरल्याने त्याचाही त्यात मृत्यू झाला.












Click it and Unblock the Notifications