Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबई शहर सौंदर्यीकरण प्रकल्प देतोय मुंबईला नवा साज, एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर ती देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. देशातील महत्त्वाची आर्थिक सत्ता केंद्र आणि उद्योग संस्थांची मुख्यालय मुंबईत आहेत. चित्रपटसृष्टीतील कलाकार मुंबईत वास्तव्यात असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी तसेच रोजगार मिळवण्यासाठी लाखो लोक मुंबईकडे येत असतात.

मंत्रालयात प्रलंबित असलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे येणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. रोज लाखो वाहने मुंबई ये जा करतात. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तसेच देशांतर्गत विमानतळावर सुद्धा प्रचंड गर्दी असते. मुंबईतील प्राचीन वास्तू पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक देखील मुंबईत येत असतात.

mumbai city

सर्वार्थाने मुंबई या शहराचे महत्त्व देशाच्या दृष्टीने अधिक आहे. या शहराचे महत्त्व सर्वात आधी ब्रिटिशांनी जाणले होते. मुंबई ठाणे ही रेल्वे पहिल्यांदा सुरू केली. एकेकाळी मुंबई हे शहर कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. महाराष्ट्राचा विदेशाशी होणारा व्यापार मुंबई बंदरातूनच केला जात होता. आताही आर्थिक दृष्ट्या, मुंबईच्या महत्त्वात कुठेही घसरण झालेली नाही. त्यामुळे मुंबई स्वच्छ आणि सुंदर दिसावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने मुंबई शहर सौंदर्यकरणाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. मुंबई महानगरपालिकेचे देखील या प्रकल्पाला महत्वपूर्ण सहकार्य लाभले.

डीप क्लीन ड्राईव्ह

मुंबई शहराच्या स्वच्छतेसाठी एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान राबवण्यात आले. त्या अंतर्गत शहरातील सर्व अंतर्गत आणि मुख्य रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले. महापालिकेचे कर्मचारी आणि शाळांतील विद्यार्थी तसेच स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी या मोहिमेत स्वतः सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रस्त्यावर उतरून या मोहिमेत सहभाग घेतला. लोकसहभागामुळे डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान लोक चळवळच बनल्याचे दिसून आले. या अभियानामुळे मुंबईला एक नवा चेहरा मिळाला.

किनाऱ्यांच्या स्वच्छतेवरही भर

डीप क्लीन ड्राईव्ह अभियानाबरोबरच मुंबई शहरातील किनाऱ्यांच्या स्वच्छतेवरही एकनाथ शिंदे यांनी भर दिला. जुहू चौपाटी, वरळी तसेच गिरगाव चौपाटीवर नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. विरंगुळ्याचे चार क्षण अनुभवण्यासाठी मुंबईकर नागरिक या चौपाटीवर गर्दी करतात. पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या किनाऱ्यांच्या स्वच्छतेकडे एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष दिले आणि किनारे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत देखील एकनाथ शिंदे यांनी स्वतः उतरून सहभाग घेतला. स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी देखील स्वच्छेने या अभियानात सहभागी झाले आणि अभियान यशस्वी झाले.

चौकांना रोषणाई

मुंबईच्या अंतर्गत भागात विविध ठिकाणी असलेल्या चौकांना ऐतिहासिक महत्त्व आहे. मुंबई शहर सौंदर्यकरणाच्या अंतर्गत या चौकांना मनोहारी रोषणाई करण्यात आली. त्यामुळे या चौकांचे मूळचे सौंदर्य आणखी उजळून निघाले. त्याबरोबरच शहरात ठीकठिकाणी असलेल्या छोट्या मोठ्या उद्यानांना सुशोभित करण्यात आले. मुंबईतली ही उद्याने हा मुंबईकरांसाठी चार क्षण विरंगुळ्याचा हक्काचा विसावा आहे. त्यांचे सुशोभीकरण करण्यात आल्यामुळे मुंबईकरांना चांगलाच विसावा मिळत आहे. या उपक्रमांतर्गत काही नव्या उद्यानांची निर्मिती देखील एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली.

वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण

मुंबईच्या अंतर्गत भागात ठीक ठिकाणी छोटी छोटी वाहतूक बेटे आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर सौंदर्यकरण प्रकल्पाच्या अंतर्गत या वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणाची कल्पना देखील आखली आणि त्याची अंमलबजावणी केली. या वाहतूक बेटावर कल्पक म्युरल्स लावण्यात आली. मुंबईच्या स्थानिक लोकसंस्कृतीचे दर्शन लोकांना व्हावे अशी या म्यूरल्सची रचना करण्यात आली त्यामुळे ही वाहतूक बेटे देखील आता खुलून दिसू लागली आहेत. शहराच्या अंतर्गत भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंती मुंबई शहर सौंदर्यकरण योजनेच्या अंतर्गत सुशोभित करण्यात आल्या आहेत त्यामुळे या संरक्षक भिंतीकडे पाहताना एक वेगळाच आल्हाद मिळतो.

मुंबई अधिक देखणी

एकनाथ शिंदे यांचे संकल्पनेतून साकारलेल्या मुंबई शहर सौंदर्यकरण प्रकल्पाच्या माध्यमातून मूळची देखणी असलेली मुंबई आता अधिक देखणी झाली आहे. शहरात विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प साकारत असतानाच नव्या स्वरूपातली आणि नवा साज ल्यालेली ही मुंबई पर्यटकांना आणि शहराला भेट देणाऱ्या नागरिकांना अधिकाधिक आकर्षित करून घेत आहे.

मुंबईकरांना नवी अनुभूती

मुंबई शहर संचालनाची जबाबदारी मुंबई महानगरपालिका निभावत असते. गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांची सत्ता आहे. मात्र चुकीची धोरणे आणि चुकीच्या निर्णयामुळे मुंबई बकाल होत चालली आहे. प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या बेकायदेशीर झोपडपट्ट्या,अतिक्रमणे आणि अस्वच्छता यामुळे मुंबईच्या सौंदर्याला बाधा आली होती. पण एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताचं मुंबईकडे विशेष लक्ष दिले.

शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला. मुंबई शहराच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी महानगरपालिका दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च करते. रस्ते काँक्रीटचे झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा हा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला मुंबई शहर सौंदर्यकरणाच्या प्रकल्प मुंबईकरांना नवी अनुभूती देत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+