मुंबईकरांनो पाणी भरून ठेवा! 24 तासांचा 'मेगा वॉटर कट'; 50 हून अधिक भागांत पाणीपुरवठा ठप्प, वाचा यादी
Mumbai bhiwandi 24 hour water cut : मुंबईला लागून असलेल्या भिवंडी शहरात पाण्यासाठी मोठा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वीच्या अत्यावश्यक देखभालीच्या कामासाठी शहरात २३ मार्च सकाळी ९ वाजेपासून ते २४ मार्च सकाळी ९ वाजेपर्यंत असा पूर्ण २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट वॉटर डिस्ट्रिब्यूशन कंपनीच्या या निर्णयामुळे ५० हून अधिक प्रभागांतील हजारो नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

का केली जातेय पाणी कपात?
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम आणि दुरुस्त करण्यासाठी हे विशेष मेंटेनन्स वर्क हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात तांत्रिक बिघाड होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
'या' भागांत पाणी येणार नाही (Affected Areas)
शहरातील प्रमुख वस्त्या आणि प्रभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. यामध्ये प्रामुख्याने खालील भागांचा समावेश आहे.
प्रमुख भाग: ममता टाकी, चाविंद्रा गाव, पटेल नगर, बाला कंपाउंड, फरीदबाग, संगमपाडा, कचेरीपाडा, ब्राह्मण आली, कसार आली, भावेनगर आणि कोंबडपाडा.
इतर वस्त्या: आदर्श पार्क, अजय नगर, गोकुळ नगर, इंदिरा नगर, कल्याण रोड, तीनबत्ती, ठाणगे आली, शिवाजी नगर स्टाफ क्वार्टर, अजमेर नगर, साईनाथ सोसायटी आणि अंजूर फाटा.
दाट लोकवस्तीचे भाग: निजामपुरा, इस्लामपुरा, आमपाडा, अवचित पाडा, शास्त्री नगर, नेहरू नगर, मिल्लत नगर, नई बस्ती, कोंडाजीवाडी, चव्हाण कॉलनी, कामतघर, कणेरी आणि अशोक नगर.
शटडाऊननंतरही 'कमी दाबाने' पुरवठा
भिवंडी महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी माहिती दिली की, २४ तासांचा शटडाऊन संपल्यानंतरही पुढील एक दिवस पाणी कमी दाबाने (Low Pressure) येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी २५ मार्च उजाडू शकतो.
नागरिकांना आवाहन
- १. महानगरपालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, पाणी कपातीपूर्वीच पुरेसा पाण्याचा साठा करून ठेवावा.
- २. उपलब्ध पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करावा.
- ३. पाण्याची नासाडी टाळावी, जेणेकरून टंचाईच्या काळात अडचण येणार नाही.












Click it and Unblock the Notifications