Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लाडकी बहीण योजना : महिलांना बनवले स्वावलंबी; व्यवसायाला मोठा आधार

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana, Devendra Fadanvis : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात मोठी महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 2 कोटी २० लाख महिलांना थेट लाभ देण्यात आला आहे. पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात थेट टाकले जात आहेत. अतिशय अल्प कालावधीत ही योजना जनमानसात पोहोचली. विशेष बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या योजनेला अधिक बळकटी देण्याचे काम झाले. तर महिलांना स्वावलंबी बनविण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून झाले, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा केले.

फडणवीसांचा मोठा वाटा

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसाठी मोठा पुढाकार घेतला. ही योजना लागू झाल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका झाली, परंतु त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून केवळ महिला सक्षमीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा राहिला आहे.

Maharashtra Assembly Election 2024

महिला सक्षमीकरणासाठी हे मोठे पाऊल

लाडकी बहीण योजनेची यशस्वी अंमलबजावणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक सभांमधून या योजनेच्या फायदे सांगितले. ते म्हणाले की, महिलांना सक्षम करण्यासाठी गावोगावी महिलांना याचा लाभ मिळत आहे. दैनदिन गरजांबरोबरच व्यवसायाच्या वृद्धीसाठी व स्वावलंबी बनण्यासाठी ही योजना अतिशय प्रबळ व लाभदायी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7500 रुपये पाठवण्यात आलेले आहेत. दुसरे म्हणजे निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यावर यात अडचण येईळ म्हणून महायुतीच्या सरकारने दिवाळीपूर्वीच राज्यातील महिलांना दिवाळी भेट म्हणून एक महिन्याच्या आधीच लाभाचे पैसे खात्यात पाठवले. त्यामुळे या योजनेबद्दलची विश्वासार्हता अधिक वाढली.

स्वावलंबी बनविण्यात मोठा वाटा

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना चांगला लाभ झाला. विशेष बाब म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेचा लाभ उपयोगात पडू लागला. आहे त्या जुन्या व्यवसायाला वृद्धिंगत करण्यासाठी देखील या योजनेचा लाभ मिळत आहे.


विरोधकांचे विरोध होऊनही ही योजना लोकप्रिय

निवडणूक काळात या योजनेच्या अंमलबजावणीस निवडणूक आयोग अडथळा आणणार, ही शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात एका हप्त्याची रक्कम अगोदरच जमा केली होती. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद केली जाणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे महिलांचा सरकारवरचा विश्वास अधिक दृढ होऊ लागला असून, महिला वर्गाच्या मनात सरकारबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

लाभार्थी महिलेने केला अनुभव शेअर

लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या लाभामुळे राज्यातील अनेक महिलांना व्यवसायवाढिसाठी फायदा झालेला आहे. या योजनेच्या लाभामुळे व्यवसायात कशी मदत झाली, यावर बोलताना जालना जिल्ह्यातील कविता विनायक पवार यांनी त्यांचा चांगला अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या की, जिजाई शिवन क्लासेस हा माझा छोटा व्यवसाय होता. दरम्यान, मला महायुतीच्या सरकारकडून लाडकी बहीण योजनेची मदत मिळाली आणि त्या पैशाला मी व्यवसायात योग्य अशी गुंतवणूक केली. नवीन शिलाई मशीन खरेदी केल्यानंतर त्यातून फायदा झाला. तसेच गावातील काही महिलांना मी शिवणकाम शिकवू लागले. त्यातून त्यांना देखील रोजगार मिळू लागला आहे.

पुढे बोलताना कविता पवार म्हणाल्या की, मला या योजनेचा मला खूप फायदा झाला. माझ्या व्यवसायात त्याचा लाभ मिळाल्याने मी गावातील महिलांना देखील शिवणकाम शिकवले. दरदिवसाला मला एक हजार ते दीड हजार रुपये रोज या ठिकाणी मिळू लागला आहे. माझ्यासोबत आलेल्या महिलांना देखील फायदा झालेला आहे. त्यामुळे ही योजना पुढे कायम चालू ठेवावी. मी योजनेमुळे स्वावलंबी झाल्याचा विश्वास कविता यांनी व्यक्त केला. तर महायुतीच्या सरकारचे अन् देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी मनापासून आभार देखील व्यक्त केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+