मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मोठा सन्मान- खा. संजय राऊत
मुंबई : केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने (ता. 3 ऑक्टोबरला) याला मंजूरी दिली आहे. मराठी भाषेसोबतच पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषासह इतर चार भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता दिल्यावर उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राउत म्हणाले "मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा मोठा सन्मान आहे. 5 भाषांना हा सन्मान मिळाला आहे- बंगाली, मराठी, पाली, प्राकृत आणि आसामी भाषेला हा सन्मान मिळावा, अशी मागणी वर्षानुवर्षे होत होती.

मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा, संताची भाषा, डॉ. बाबासाहेब आंबडेकर, संविधान, महात्मा फुलेंची , बाळासाहेब ठाकरेंची भाषा आहे. मराठी भाषेला सन्मान मिळावा म्हणून आमची मागणी होती. राज्यातील जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांनी गेल्या 30-35 वर्षांपासून प्रत्येक मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने ही मागणी केली होती.
ज्या-ज्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरु होत होते त्यावेळी महाराष्ट्राच्या खासदारांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी केली होती.यात शिवसेना खासदारांचा ही समावेश होता. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने अनेकवेळा पंतप्रधान,गृहमंत्री सांस्कृतिक मंत्र्यांना भेटून मागणी केली होती. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, यात सर्वांचे योगदान आहे, फक्त एका व्यक्तीचे नाही. भाजपला प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याची सवय आहे, भाजपाने कोरोनाचे ही श्रेय घेयला हवे, हे त्याचंच श्रेय आहे. या देशात कोरोनामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला त्याचं ही श्रेय भाजपाने घेयला हवं,असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
#WATCH | On Union Cabinet approves Marathi (along with 4 other languages) as a classical language, Shiv Sena UBT leader Sanjay Raut says, "It is a great honour that Marathi has been given classical language status. 5 languages have been given this honour- Bengali, Marathi,… pic.twitter.com/1LIWyP6Xt0
— ANI (@ANI) October 4, 2024
महाराष्ट्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब- शरद पवार
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. 'मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी साहित्याच्या क्षेत्रातील सर्वांनी केली होती. साहित्य परिषदेमध्ये,अधिवेशनामध्ये ठराव करून ही मागणी करण्यात आली होती.
माझ्यासारखे अनेक सहकारी , ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आस्था आहे, आम्हीसुद्धा व्यक्तीगत पातळीवर केंद्र सरकारकडे मागणी करत यासंदर्भात आग्रह, पाठपुराव केला होता,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 'मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा हा जो निर्णय आहे, त्याला खरंतर उशीर झाला, पण तरीही तो निर्णय झाला याचा आनंद आहे, त्याबद्दल मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो' , अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.












Click it and Unblock the Notifications