Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आनंदाची बातमी! या दिवशी मान्सून केरळमध्ये, मुंबईत 'या' दिवशी कोसळणार पाऊस, वाचा IMDचा इशारा

Monsoon Update news, maharashtra Mansoon News : यंदाच्या मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. नैऋत्य 'मॉन्सून' केरळमध्ये अवघ्या दोन किंवा तीन दिवसांत दाखल होण्याचा अंदाज आयएमडीने इशारा दिला आहे.

दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते सद्या स्थिर आहे. परिणामी महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

monsoon update news

25 मे पर्यंत मान्सून केरळात येणार!

पुढील दोन दिवसांत मान्सून केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. 25 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत साधारण 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण भागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.

तर मुंबईत पावसाचा जोर पुढील काही दिवस कमी राहणार आहे. यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या भागात असे असेल पावसाची स्थिती

पूर्व-मध्य अरबी समुद्रात, कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र 23 मे च्या संध्याकाळपर्यंत तीव्र होऊन अवदाबमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

याच्या प्रभावामुळे कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी), मध्य महाराष्ट्र (पुणे, सातारा, सोलापूर), मराठवाडा (बीड, परभणी, नांदेड) आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईला ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागाने 22 ते 24 मे दरम्यान कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

विशेषतः मुंबई आणि परिसरात 23 मे रोजी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे जलमय परिस्थिती आणि वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायगड-रत्नागिरीत पावसाचा रेड अलर्ट

दिनांक 23 मे रोजी कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

तसेच, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+