Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याच्या मागणीसाठी शिंदे गटाची कोर्टात धाव....

मुंबई : दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी समर्थक आमदारांना घेऊन 21जून 2022 रोजी गुवाहाटी ला गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली. 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. आता शिवसेना कोणाची हा वाद सुरू झाला. हा वाद कोर्टामध्ये गेल्यानंतर शिंदेंकडे आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाले.

Cm Eknath Shinde  amp amp  uddhav thackeray

दोन्ही गटाचे आमदार पात्र..

त्यानंतर कोणत्या गटाचे आमदार अपात्र होणारी याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले होते.

सहा ऑगस्टला सुनावणी..

मात्र त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अपात्र करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केले आणि कोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने याबाबत तातडीने सुनावणी करावी आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अपात्र करावेत यासाठी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी याचिका केली आहे आणि आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. न्यायालयाने यावर सहा ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे.

ठाकरे गटाचा आक्षेप...

मात्र याचिकेवर शिवसेना ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप आहे.सात महिन्यानंतर तातडीच्या सुनावणीचा आग्रह का केला जातोय असे शिवसेना ठाकरे गटाचे वकील विनयकुमार खातू यांनी सवाल उपस्थित करत आक्षेप घेतला आहे. न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाकडून सहा ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित केला आहे आमदारांचा कार्यकाळ सप्टेंबर अखेरीस संपत आहे. आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी झाली नाही तर याचिका निष्फळ ठरेल,त्यामुळे अचानक तातडीची सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+