प्रसिद्ध साहित्यिक भास्कर चंदनशिव यांची प्रकृती चिंताजनक, उपचार सुरु लाल चिखल धड्यातून पोहचले घरोघरी
Marathi Writer Bhaskar Chandanshiv passes away : 'अंगारमाती'तून 'लाल चिखल' हा इयत्ता दहावीतील धडा विद्यार्थ्यांमध्ये ठसवणारे आणि शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडणारे प्रसिद्ध मराठी साहित्यिक प्रा. भास्कर तात्याबा चंदनशीव यांच्यावर लातूर येथे उपचार सुरु आहेत. गावगाड्याचे जगणे मांडणारा लेखक साहित्यिक म्हणून ते खास परिचित आहेत.
दिव्य मराठीच्या वृत्तानुसार, धाराशीव जिल्ह्यातील मुळचे असलेले भास्कर चंदनशीव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नसून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना लातूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भास्कर चंदनशीव कोण आहेत?
मराठी ग्रामीण साहित्यविश्वात आपल्या कथांमधून मातीतील वेदना आणि माणसाचं जगणं प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर तात्याबा चंदनशिव आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमातील लाल चिखल या धड्यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना परिचित आहेत.
व्यक्तिगत आणि शैक्षणिक प्रवास
भास्कर चंदनशिव यांचा जन्म १२ जानेवारी १९४५ रोजी निजाम राजवटीतील मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब गावापासून जवळ असलेल्या हासेगांव येथे झाला. त्यांचे मूळ नाव भास्कर देवराव यादव होते, पण दत्तकविधाननंतर ते भास्कर तात्याबा चंदनशिव म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेड्यात झाल्यानंतर, पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी अंबाजोगाई आणि छत्रपती संभाजीनगर येथे आले व तेथे त्यांनी ते पुर्ण केले.
मराठवाड्याच्या दुष्काळावर साहित्याचा पाया
वयाच्या विसाव्या वर्षी कथालेखनाला सुरुवात करणाऱ्या चंदनशिव यांच्या साहित्याचा पाया मराठवाड्याच्या काळजावर कोरलेला दुष्काळ हा राहिला. इ.स. १९६२ ते १९७२ या दशकात त्यांनी दुष्काळाचा बारकाईने अभ्यास केला आणि अनुभव घेतला, ज्यामुळे त्यांच्या लेखनाला एक वेगळी धार मिळाली.
साहित्यिक क्षेत्रातील योगदान
भास्कर चंदनशिव यांच्या साहित्यकृतींचा केंद्रबिंदू नेहमीच ग्रामीण भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिक राहिला आहे. त्यांची नाळ मातीशी जोडलेली असल्याने, त्यांच्या कथांमध्ये गावगाड्याचं आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याचं चित्रण अत्यंत सच्चेपणाने आले आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण कथासंग्रहांनी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे शेतीत आणि मानवी समाजजीवनात आलेल्या वेदनांचे कोंब वाचकांसमोर उभे केले.
प्रमुख कथासंग्रह
- कथासंग्रहाचे नाव वैशिष्ट्ये
- अंगारमाती - ग्रामीण जीवनातील ज्वलंत वास्तव आणि संघर्ष
- जांभळढव्ह - मातीतील मानवी नात्यांचे आणि भावनांचे चित्रण
- मरणकळा - ग्रामीण भागातील जीवघेण्या समस्या आणि दुःखाचे प्रतिबिंब
- बिरडं
- नवी वारुळं
- भिंगुळवाणा
पुरस्कार, सन्मान आणि संमेलनाध्यक्षपद
- ग्रामीण साहित्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल भास्कर चंदनशिव यांना अनेक सन्मान मिळाले.
- १ले ग्रामीण साहित्य संमेलन: ते २०११ मध्ये केज (जिल्हा बीड) येथे झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
- मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन: २ फेब्रुवारी २०१२ रोजी पळसप (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे झालेल्या एकदिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचेही त्यांनी अध्यक्षपद भूषवले.












Click it and Unblock the Notifications