'छगन भुजबळ का सरकारचा बाप आहे?, त्यालाच अक्कल आहे का?', मनोज जरांगे पाटील संतापले!
Manoj Jarange vs Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वादामुळे या विषयाला एक वेगळाच रंग चढला आहे.
सरकारने मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतला, पण या निर्णयामुळे ओबीसी नेते, विशेषतः छगन भुजबळ प्रचंड नाराज झालेले आहेत.

भुजबळांचे पत्र आणि जरांगेंचा संताप
राज्यात मराठा आरक्षणासाठी कुणबी दाखले देण्याचा शासन निर्णय (जीआर) जारी झाल्यानंतर, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांना आठ पानांचे पत्र लिहून हा जीआर रद्द करण्याची मागणी केली.
या पत्राची बातमी समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापले. त्यांनी भुजबळांवर कठोर शब्दांत टीका केली. "त्याने आठ पानांचे किंवा आठशे पानांचे पत्र देऊ द्या, मुख्यमंत्री त्याला कचरापेटीत टाकतील, कारण तो सरकारचा बाप नाही." अशा थेट शब्दांत जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सरकारला जरांगेंचा थेट इशारा
जरांगे पाटील यांनी केवळ भुजबळांवरच नव्हे, तर सरकारलाही कडक शब्दांत इशारा दिला आहे. "जर सरकारने या निर्णयामध्ये हेराफेरी केली तर त्यांना रस्त्याने फिरू देणार नाही," असे ते म्हणाले.
याशिवाय, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या उपसमितीने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भुजबळांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला.
"मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना अक्कल नाही आणि फक्त तुम्हालाच अक्कल आहे का?" असा सवाल त्यांनी केला.
जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भुजबळांना जेलमध्ये टाकण्याची मागणीही केली. "फडणवीसांनी त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे, हा सरकारचा मालक झाला का?" असे ते म्हणाले.
भुजबळांची पीसी आणि नाराजीची कारणे
मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती दर्शवली, पण त्यांची नाराजी कायम होती. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या जीआरवर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, हा जीआर दबावाखाली काढण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications