Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

41 लाखांचं बक्षीस असणाऱ्या माओवादी पती-पत्नीचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण!

गडचिरोली : गडचिरोली जिल्हातून मोठी बातमी समोर आली आहे.गडचिरोली जिल्हातील सर्वात प्रमुख माओवादी नेता असलेल्या गिरधर आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

dcm devendra fadnavis

गिरधर याच्यावर २५ लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होत. तर त्याच्या पत्नीवर १६ लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. गडचिरोली दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. गिरधर याच्या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली जिल्हातील माओवादी चळवळीची पूर्ण कंबर मोडली आहे, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या या कारवाईचं कौतूक केलं आहे. गडचिरोली पोलिसांनी सातत्याने त्यांचे शौर्य दाखवत ही परिस्थितीची जाणीव करुन दिली. एकतर आत्मसमर्पण करा नाहीतर तुम्हाला त्या परिस्थितीला सामोर जावं लागेल.त्यामुळे गिरधर याचं प्रमुख आत्मसमर्पण झालं असल्याचं फडणवीस यांनी सांगितले.

सी-६० दल, पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी सातत्याने याठिकाणी केवळ माओवाद्यांचा सामना केला नाहीतर त्यासोबत एक सोशल आऊटरिच केलं. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजनांची माहिती पोहचवण्याचे काम यांनी केलं आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये पोलीस आणि प्रशासनाबद्दल एक मोठी संवेदना जागृत झाली आहे. दरम्यान गावातील गावकरी माओवाद्यांना गावात थारा देत नाहीत आणि पोलिसांनी ते अधिक जवळचे मानतात हा एक महत्वाचा फरक असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढें बोलताना म्हणाले, आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना आज आपण संविधानाची प्रत दिलेली आहे आणि अपेक्षा व्यक्त केली आहे की माओवादी संविधान मानत नाही. ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांनी संविधानरूप पुढचे जीवन जगतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+