मोठी बातमी:अब्दुल सत्तारांच्या मध्यस्थीने जरांगेंचे फडणवीसांशी फोनवर बोलणे! पहाटे 3 वाजेपर्यंत खलबतं
Manoj Jaranges phone conversation with Devendra Fadnavis:मुंबईत मंत्रीमंडळाची महत्त्वाची आज असून या बैठकीपूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. काल मध्यरात्री उशीरा सुरु झालेली बैठक, तब्बल तीन तास म्हणजेच आज पहाटे तीन वाजेपर्यंत चालल्याची माहिती आहे. या बैठकीतूनच मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर बोलणे केल्याचेही समजते.
बैठकीनंतर आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत फडणवीसांशी बोललो असं जरांगे यांनी सांगितलं. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत काही ना काहीतरी तोडगा काढावा लागेल, असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं. मात्र मंत्रीमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीपुर्वीच जरांगे आणि सत्तार यांची भेट झाल्याने मराठा आरक्षण लवकर मिळेल का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

आज मंत्रीमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक
मंत्री अब्दुल सत्तार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यामध्ये पहाटे अडीच वाजेपर्यंत तीन तास चर्चा झाली. ही बैठक कशासाठी होतं, ते मनोज जरांगे यांनी बैठकीनंतर सांगितलं. शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्यावी, तसेच मराठा आरक्षणासच्या मागणीपबाबत ही चर्चा झाली, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
याशिवाय चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या नुकसानीवर देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवरती चर्चा झाल्याचा मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे यांनी केलेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. आज बैठकीतही यावर चर्चा होणार आहे, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.
आजच्या बैठकीकडे लागले लक्ष
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचं सत्तारांचं म्हणणं आहे. अतिवृष्टीमुळं अनेक भागात शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळं नकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत, त्यांनी तातडीनं नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी या बैठकीत केल्याचं समजते.
दरम्यान, आज मुंबईत मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्नावर चर्चा होऊन त्यावर तोडगा निघेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications