Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनोज जरांगे निवडणूक लढवणार नाही मग कुणाचा फायदा, कुणाचे नुकसान? समिकरणे घ्या जाणून

Manoj Jarange's decision not to contest assembly election : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली आहे. या निवडणुकीत त्यांनी ऐनवेळी युर्टर्न घेत घोषणा केली म्हणजे महायुतीच्या नेत्यांना अंधारात ठेवून हा गनिमी कावा त्यांनी खेळला असे बोलले जात आहे. यात बऱ्याचअंशी तथ्थ्य आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात राज्याची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार फाईट सुरु आहे. अशातच मनोज जरांगेंनी ऐनवेळी निवडणूक लढवण्याचा निर्णय रद्द केला. यामुळे या निर्णयाचा कुणाला कितपत फायदा आणि कुणाला किती नुकसान झाले असते हे आपण पाहूया.

मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली त्यानंतर आपले उमेदवार आणि मतदारसंघही जाहीर करण्यात आला. आपल्या उमेदवारांना अर्ज भरण्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले होते. यानंतर मुस्लिम नेत्यांशी त्यांनी चर्चाही सुरु केली होती. तर दुसरीकडे दलित समाजालाही सोबत घेण्याचा प्रयत्न मनोज जरांगे यांनी केला होता.

Manoj Jarange s decision not to contest assembly election

केवळ मराठा मतांच्या जोरावर राज्यातील निवडणुका जिंकता येणार नाही हे स्पष्ट सांगत मनोज जरांगेंनी मराठा-दलित आणि मुस्लिम मतांची मोट बांधायला सुरुवात केली होती पण मनोज जरांगेंनी आज निर्णय घेत भुमिकाच जाहीर केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाराष्ट्रातील समिकरण पुन्हा बदलणार आहेत.

महाविकास आघाडीचे होणारे नुकसान टळले!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार उभे राहणार होते. यासाठीच महायुतीचे काही नेते निश्चितच प्रयत्नशील होते. कारण त्यांना मराठा, दलित आणि मुस्लिम व्होटबँकेत महाविकास आघाडीची गळचेपी करायची होती, ज्यामुळे महाविकास आघाडीचे नुकसान होणार होते.

जरांगे पाटील यांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला असता, तर मराठा, दलित, मुस्लिम मतांचे विभाजन होणार हे निश्चित होते, असे झाले असते तर महाविकास आघाडीचे सर्वाधिक नुकसान झाले असते. म्हणजेच हेच भाजपला हवे होते आणि त्यामुळे भाजपला फायदा झाला असता त्यांचा बहुमताचा आकडा गाठण्यास या गोष्टींमुळे मोठा फायदा झाला असता.

शरद पवारांनी केला आनंद व्यक्त

मनोज जरांगे पाटील यांनी आज घेतलेल्या निर्णयानंतर शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "महाविकास आघाडी आणि जरंगे पाटील यांच्यात निवडणुकीच्या राजकारणापासून दूर दुरपर्यंतत संबंध नाही पण त्यांनी हा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे. त्यांनी उमेदवार उभे केले असते तर त्याचा फायदा भाजपला झाला असता, हे स्पष्ट आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले. म्हणजे मविआला किती मोठा फटका बसणार होता हे स्पष्ट आहे.

...मग आता निवडणुकीत काय होणार?

मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात 70 जागा आहेत. या दोन्ही क्षेत्रात मनोज जरांगे यांचा लक्षणीय प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षाचे उमेदवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजासोबतच संविधान बदलण्याच्या मोहिमेमुळे आणि मुस्लिम समाजाला टार्गेट केल्याने तिन्ही समाज (मराठा, मुस्लिम, दलित) महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिला. यावेळी भाजप नेत्यांच्या मुस्लीम समाजाविरोधातील भाषणबाजीमुळे येथेही त्याचीच पुनरावृत्ती होईल, अशी अपेक्षा आहे.

मनोज जरांगेंच्या निर्णयामुळे भाजपचे नुकसान

दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या व्होटबँकेला खिंडार पाडण्यासाठी भाजपने 'काटेंगे तो बातेंगे' या धर्तीवर प्रचार सुरू केला आहे. यामुळे महायुतीला हिंदू मतांना एकत्र ठेवून अधिक फायदे हवे आहेत. पण अजित पवारांच्या पक्षाची विचारधारा मोठा स्पीड ब्रेकर ठरत आहे. कारण आजही तो धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काम करत आहे. त्यामुळे आता मनोज जरंगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याची खेळी महायुतीला मोठी हानी पोहोचवू शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+