Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धनंजय मुंडे म्हणाले- हाताला काम द्या, रोहयोच्या कामावर जा- जरांगेचा पलटवार; धस व दमानियांचीही टीका

Manoj Jarange on Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रायगडमधील एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंडे यांनी, "मला आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या," असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचा राजकीय अर्थ, त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळवायचे आहे, असा घेतला जात आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली आहे.

मनोज जरांगे यांचा सणसणीत पलटवार

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी धनंजय मुंडेंच्या विधानावर अत्यंत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "रोजगार हमीच्या कामावर जा म्हणावं, बाराशी खांदायला." तसेच, "तो माझा प्रश्न नाही, तो राजकीय आणि त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, त्याच वेळी त्यांनी मराठा समाजाला त्रास झाल्यास अजित पवारांसाठी परिस्थिती बिकट होईल, असा थेट इशाराही दिला.

जरांगे यांनी या वेळी छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. "तो तसेच लोक कामाला लावतो, मग त्याला खेळायला मोकळं रान राहतं. तो फुकटात जातींचा उपयोग करून घेतो," अशा शब्दांत त्यांनी भुजबळांवर टीका केली. ओबीसी आणि मराठ्यांचे नुकसान केल्याबद्दल भुजबळांना पापाची फेड करावी लागेल, असेही जरांगे म्हणाले.

manoj jarange suresh dhas

धस यांचे खुमासदार उत्तर

धनंजय मुंडेंच्या विधानावर आमदार सुरेश धस यांना विचारले असता, त्यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. सध्या आपल्या मतदारसंघात पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दोन दिवसांत याबद्दल 'खुमासदार उत्तर' देणार असल्याचे सांगून त्यांनी उत्सुकता वाढवली आहे.

अंजली दमानिया यांची कठोर भूमिका

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंना कुठल्याही सार्वजनिक पदापासून दूर ठेवले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. "त्यांचा आता वेळ जात नाही आहे, त्यामुळे त्यांनी तटकरे यांच्याकडे काम मागितले आहे. पक्षाची बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशी अनेक कामे आहेत, ती त्यांनी करावीत. पण, जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत येऊ नये," असे दमानिया यांनी म्हटले.

धनंजय मुंडे यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर घेतलेली आक्रमक भूमिका पाहता, येत्या काळात यावर अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+