Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनोज जरांगे पाटलांचा आता शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी लढा, आंदोलनाची तारीखही ठरली

जालना : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. "राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं पण ते पूर्ण केलं नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची तयारी करत आहोत. तसेच आता पुढचं आंदोलन आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार आहे." अस मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले

जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी आंदोलन करणार असून राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात याच अनुषंगाने बैठका घेणार आहे. या बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरी आणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार आहेत. लवकरच शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे राहिले आहेत, सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवते.

Manoj Jarange Patil

विधानसभा मतदारसंघानिहाय घोंगडी बैठका

5 सप्टेंबर पासून विधानसभा मतदारसंघानिहाय घोंगडी बैठका होणार असल्याची घोषणाही मनोज जरांगे पाटीली यांनी यावेळी केली. निवडणुका आल्या की साड्या वाटतात, आताही यांचं तसंच सुरु झालं आहे. सगळे मुद्दे आम्ही ताकदीने लावून धरणार आहोत. असं जरांगे म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली भेट; लक्ष्मण हाकेंची टीका

नुकतेच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हा यांनी जरांगेची भेटल घेतली, त्या आधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मनोज जरांगे यांची अंतरवालीत जाऊन भेट घेतली. मी केवळ त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो, असे चव्हाण यांनी सांगितले होते. यावर ओबीसी नेते भेटीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर जरांगे यांना रेड कार्पेटच टाकतात.

पण चारही आजी-माजी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात सामाजिकदृष्ट्या मागास राहतात याचं थोडं सुद्धा सोयर सुतक नाही. हे सगळे आजी-माजी मुख्यमंत्री ओबीसी आरक्षणाबद्दल एक चकार शब्द सुद्धा काढत नाहीत. यांना फक्त जरांगेंच्या मताची काळजी आहे. निवडणुकीनंतर हे सगळेजण ओबीसी आरक्षण संपवणार असा आरोपही हाके यांनी केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+