फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, कळीचा नारद छगन भुजबळच, मराठे जशास तसे उत्तर देतील - मनोज जरांगे
Manoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचं वाटोळ करायला लागले आहेत. आमचा रस्ता बंद केला आहे. गावातून जाऊ दिलं जात नाही. पण फडणवीसांना ही शेवटची संधी आहे. आम्ही देखील जशास तसे उत्तर देणार, असा इशारा मनोजल जरांगे पाटील यांनी देत फडणवीसांवर पुन्हा जोरदार निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
आता शेवट मराठा समाज करेल...
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारले आहे. हेच जर मराठा समाजाने केले असते तर छगन भुजबळ यांनी किती थयथयाट केला असता. यात कळीचा नारद भुजबळच आहे. आता सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मराठा करणार असा गर्भीत इशारा जरांगेंनी दिला. वडीगोद्री व आंतरवाली सराटीच्या हद्दीत काल मराठा आंदोलकांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यावर जरांगे यांनी भाष्य केले.

अंमलबजावणी नाही तोपर्यंत उपोषण..
आता आमचे रस्ते बंद केलेत, काही दिवसांनी आम्ही देखील तुमचे रस्ते बंद करु असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंमलबजावणी केल्याशिवाय हे आमरण उपोषण सुटणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आणि ओबीसी वाद नाही
मराठा आणि ओबीसी वाद नसल्याचे मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांनी शांत राहावं असं आवाहन मी करत आहे. मराठा-ओबीसी कधीच भांडत नाहीत. हे छगन भुजबळांनी केलं असल्याचे जरांगे म्हणाले. मराठ्यांना आरक्षण दिल्यावर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. त्यामुळं भांडण वाढवण्याचे गरज नाही. मराठ्यांच्या नोंदी सापडल्यावर त्यांना आरक्षण दिले पाहिजे हे ओबीसींना समजते, असे जरांगे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications