आम्हाला कमजोर समजू नका, सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही - मनोज जरांगे पाटील
हिंगोली : बीड जिल्ह्यातील मराठ्यांवरील त्रास थांबवा, मराठ्यांना कमजोर समजू नका. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही. असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील यांची आज हिंगोलीत शांतता रॅली सुरु आहे. यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला इशारा दिला.

मनोज जरांगे यांनी आज पासून मराठवाड्याच्या दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात हिंगोली शहरातील रॅलीने झाली. रॅलीत मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत. सगळीकडे भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या परिधान केलेल्या समाजबांधवांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांचा जंगी सत्कारही हिंगोली जिल्ह्याच्या वेशीवर करण्यात आला. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे सरकारला इशारा देताना म्हणाले, आम्ही राज्य सरकारवर विश्वास टाकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. अन्यथा आणखी मोठा जनसमुदाय उसळेल. छगन भुजबळ यांना काही काम नाही. ते पडेल लोकांना गोळा करीत आहेत.
...तर 2 तासात कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य असून आम्ही 13 तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीमधील सर्व गुन्हे मागे घेतील असा आम्हाला विश्वास वाटतो. मुळातः राजकीय इच्छा शक्ती असली तर 7 दिवस नाही, 2 घंट्यात कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात. एकटाच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असते, त्यामुळे मराठा समाजाने या शांतता रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.












Click it and Unblock the Notifications