Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मेलो तरी मागे हटणार नाही! मराठ्यांना आरक्षण मिळवून देईलच, 20 जूलैपासून पुन्हा उपोषण - जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर - सरकारकडे आजची रात्र आहे. त्यांनी विचार करावा, अन्यथा येत्या 20 तारखेला स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरु करेल. आता मेलो तरी मागे हटणार नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात शांतता रॅली काढली. आज या रॅलीचा छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीचौकात मनोज जरांगे यांची रॅली पोहचली असून त्यांना मोठा हार क्रेनच्या साह्याने घालण्यात आला आहे. यानंतर त्यांनी रॅलीतील मराठा समाजबांधवांना संबोधित केले.

Manoj Jarange Peace Rally

सरकारच्या हातात आजची रात्र

जरांगे पाटील म्हणाले, कोपर्डीच्या ताईला अजूनही न्याय मिळालेला नाही. काहीही झाले तरी मराठे न्याय देणारच. देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीवाल्यांनो आता पडणार की नाही सरकार अशा शब्दात त्यांनी दोन्ही पक्षाला आव्हान दिले. त्यांना आपल्या वेदना कळणार नाही. आज एक महिना झाला सरकारने वेळ मागितला होता. आजची रात्र सरकारच्या हातात आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे. सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, मराठा समाजाच्या आंदोलकांवरील केसेस मागे घ्याव्या. आमच्या एकूण नऊ मागण्या आहे.

288 उमेदवार पाडणार

जरांगे पाटील म्हणाले, 288 उमेदवार पाडल्याशिवाय राहणार नाही. सरकारला जाहीर सांगतो की, आमच्या नऊ मागण्या पूर्ण करा. राज्यात एकूण पाच टप्पे आहेत. आज पहिल्या टप्प्याचा समारोप आहे. मी अन्न-पाण्याचा विचार केला नाही. आम्ही कट्टर आहोत. सरकारने छगन भुजबळांच्या नादी लागू नये. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मी सांगतो की, मराठे मुंबईपर्यंत पोहचू शकतात.

ओबीसीतून आरक्षण द्या

जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे, समाजाने शांत राहावे, मी समाजाचा मुलगा आहे. सरकारच्या हातात आज रात्र आहे , त्यामुळे सरकारने विचार करावा. मला राजकारणात जायचे नाही पण आमचा आग्रह एवढाच आहे की, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या. आम्हाला तुमच्या राजकारणाशी घेणे देणे नाही. जर आज रात्रीतून आरक्षण नाही दिले तर मी 20 तारखेला स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरु करतोय. आता मेलो तरी मागे हटणार नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.

मुंबईला स्वारी, तारीख घोषित करणार

जरांगे पाटील म्हणाले, उपोषण सुरु झाल्यानंतर मुंबईची तारीख कधी घोषित करायची मुंबईला कधी जायचे हे आपण ठरवू. 288 उमेदवार पाडायचे की, उभे करायचे हे मी ठरवणार आहे. समाजाचा रक्त पिणारी पैदास माझी नाही. सरकार आपल्यावर डाव टाकत आहेत, त्यामुळे मला आणखी डाव टाकू द्या असे समाजाला त्यांनी आवाहन केले.

जालना रस्ता बंद

आज सकाळी 11 वाजेपासून छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोड बंद करण्यात आला आहे. तसेच या रॅलीमुळे कारागृह शिपाई भरती रद्द करण्यात आली आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+