भाजपवाल्यांना सांगतो, आत्ताच शहाणे व्हा! अमित शहा काय सूर्य आहेत का?- जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सद्या संभाजीनगर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एका मोदी शहांवर निशाणा साधला. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांना पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर अमित शहा काय सूर्य आहेत का, ते पण हाडामाडाचे माणूसच आहेत ना, फक्त देशाच्या गृहमंत्रीपदावरच बसलेत ना, असे म्हणत त्यांनी शहांवर पुन्हा एकदा निशाणा साधला.

अभ्यासकांशी चर्चा हे नाटकं बंद करा
मनोज जरांगे म्हणाले की, टीका न करण्यासाठी अमित शहा हे सूर्य आहेत का? ते केवळ केंद्रीय गृहमंत्री आहेत. मराठ्यांचे आंदोलन सरकारने गोडी गुलाबीनेच हाताळावे. त्यांनी मराठ्यांचा रोष पत्करू नका. अन्यथा आम्हाला नाईलाजाने आरे ला कारे म्हणावे लागले. पटेल, गुर्जर व पाटीदार एकत्र आले तर तुमचे अवघड होईल. मी राजकीय भाषा करत नाही. राजकारणही करणार नाही. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, एवढेच माझे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणणे आहे. सरकार आता अभ्यासकांशी चर्चा सुरू असल्याचा दावा करत आहे. आता त्यांना अभ्यासक कशाला हवेत? मी सरळ सांगतो, अभ्यासकांना चर्चेला बोलावण्याचे नाटक बंद करा. 13 महिने झाले त्यांना हे आठवण झाली नाही का? हा सरकारचा ट्रॅप असेल तर त्यांना काहीही मिळणार नाही. मराठा समाज आपल्या मागण्यांवर ठाम आहे.
नारायण गडावर मेळावा होणार..!
मनोज जरांगे यांनी यावेळी दसऱ्याच्या दिवशी नारायण गडावर आपला दसरा मेळावा होणार असल्याचीही घोषणा केली. दसऱ्याच्या दिवशी दुपारी 12 वा. नारायण गडावर आपला मेळावा होईल. मी दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मराठा समाजानेही मोठ्या संख्येने तिकडे यावे. सर्वांनी एकजूट दाखवावी. नारायण गडावर राजकीय बोलणे किंवा निर्णय होणार नाही. पण मराठा समाज तिथे आपली एकी दाखवेल, असे जरांगे म्हणाले.
चर्चा काय करता, तोडगा काढा?
नऊ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरु आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मला आणि माझ्या समजाला शक्ती दाखवण्याची गरज नाही. सरकारचा काय डाव आहे. बनवा बनवी आहे कळत नाही. सरकारने अभ्यासक बोलवायची काय गरज आहे, तुमचा काही ट्रॅप आहे. आमचेही अभ्यासक बोलावा, त्यांचाही विचार घ्या. माझ्या विरोधात रान उठवून काही होणार नाही. 40 वर्षांपासून तीच तीच चर्चा सुरू आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
प्रविण दरेकरांचा घेतला समाचार
काल बोलताना मनोज जरांगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमित शाह यांना कत्तली करायच्या का? दादागिरीने यांना सत्तेची खुर्ची आणायची आहे. पण जनतेने राजकीय एन्काऊंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगेनी टीका केली. त्यावर प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर टीका केली. त्याला आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह बोलले म्हणून आम्ही बोललो. आरक्षण प्रश्नावर मार्ग काढाय आचारसंहिता लागण्या अगोदर मराठा आरक्षण दिलं नाही. सर्व मागण्या मान्य केल्या नाही तर पश्चाताप होईल, असं म्हणत जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.












Click it and Unblock the Notifications