लढायचं की पाडायचं? हे गुप्तपणे ठरवणार; मनोज जरांगेंचा निर्णय, 'ही' रणनिती बदलली वाचा पुढे काय करणार?
Manoj Jarang Election Policy Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करायचे की, भाजपसह इतर पक्षांचे उमेदवार पाडायचे यासंदर्भात मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी प्लॅन गुप्त ठेवला आहे,निवडणुकी पुढे ढकलून सरकार जसा डाव खेळतंय, तसेच आपणही डाव खेळायचे, असे म्हणत जरांगे यांनी ही बैठक आता पुढे ढकलली आहे.
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी ध्येय धोरणासंबंधीत निर्णयावरील बैठक लांबणीवर टाकली आहे. म्हणजेच ते आपला प्लॅन सद्या तरी जाहीर करणार नाही ते हा प्लॅन ते गुप्त ठेवणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

मनोज जरांगे यांची सरकारवर आगपाखड
गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पाच वेळा आंदोलन केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मराठा समाजाची महत्त्वाची बैठक यापूर्वी 29 ऑगस्टला होणार होती. मात्र आता मनोज जरांगे यांनी आपली रणनिती बदलली.
निवडणुकी पुढे ढकलून सरकार जसा डाव खेळतंय, तसेच आपणही डाव खेळायचे, असे म्हणत जरांगे यांनी ही बैठक आता पुढे ढकलली आहे. जरांगे यांनी याबाबत सरकारव पुन्हा आगपाखड केली.
29 तारखेची बैठक पुढे ढकलली
आंतरवली सराटीत 29 तारखेला विधानसभा लढायची का समोरच्याला पाडायचे याबाबत निर्णय होणार होता. परंतु सरकार आमच्या निर्णयाची वाट पाहत होते. आमची रणनिती त्यांना कळू नये, त्यांचेही डाव यशस्वी होऊ नये म्हणून आम्हीही 29 तारखेची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे जरांगे यांनी आज स्पष्ट केले.
आम्ही आत्ताच आमची रणनिती जाहिर केली तर सरकारला त्यावरही डावपेच खेळता येतील, त्यामुळे आम्हीही आमची भूमिका गुलदस्त्यात ठेऊन योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
दीड दोन महिन्यांनी ठरवू लढायचं की नाही
29 ऑगस्ट रोजी बैठक होणार नाही असे मनोज जरांगे यांनी आज सांगितले. तसेच दीड- दोन महिन्यांनी लढायचं की पाडायचं हे ठरवू, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. जरांगे पुढे म्हणाले, प्रत्येक गावात ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनी दाखले घ्यावेत व ज्यांना नोंदी सापडल्या नाहीत त्यांनी तहसिलदारांकडे जाऊन जाब विचारावा. सरकारवर आता बेकार वेळ आली आहे. आता बैठक होणार नसली तरी आपण मतदारसंघनिहाय घोंगड्या बैठक घेऊ, या बैठकीला मी येतो असे जरांगे म्हणाले.
इच्छुकांना प्रस्ताव 24 तारखेपर्यंत देता येणार
अंतरवली सराटीत इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यांना काय निर्णय घ्यावा, ते कळेना. मराठा समाज आता एक झाला आहे. येणाऱ्या निवडणुकीत सरकारला पुन्हा आमची ताकद कळणार आहे. अंतरवलीत पुन्हा बैठक होणार नाही. मात्र इच्छुकांना आपले प्रस्ताव 24 तारखेपर्यंत देता येणार आहेत. प्रस्ताव आल्यानंतर छाननी होईल. राज्यात प्रत्येक तालुक्यात एक बैठक घेऊन निवडणुकांबाबत चर्चा करण्यात येईल, असेही जरांगे यांनी आज स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications