फडणवीस साहेब! आरक्षण द्या, नाहीतर मराठे तुम्हाला लोळवल्याशिवाय सोडणार नाही - जरांगेंचा इशारा

Manoj Jarange on Devendra Fadanvis : फडणवीस साहेबांनी फक्त सगे-सोयऱ्यांची मागणी मान्य करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं, मी त्यापुढे राजकारणावर एक शब्दही बोलणार नाही. फडणवीसांनी आपल्याविरोधात मराठा आमदार उभे केलेत. त्यांनी जर मराठा आरक्षण दिले नाही तर त्यांना राजकारणात लोळवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते परळीत आयोजित घोंगडी बैठकीत बोलत होते.

मनोज जरांगे बैठकीत बोलताना म्हणाले की, आता गावागावात घोंगडी बैठकीचे नियोजन करा. पुढील तीन महिने मराठ्यांच्या अस्मितेचे आहेत. कोणतीही लढाई माणूस केवळ बेसावध झाला तेव्हाच हारतो. उद्यापासूनच गावागावात 20 पोरांची टीम तयार करा. ज्या गावात अशा टीम तयार होतील त्याच गावात घोंगडी बैठका होतील. गरीब मराठा सगळा बाजूला गेलाय. श्रीमंत मराठ्याला गरीब मराठा जमत नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी आठ दिवस आधी आपण बैठक घेवू आणि मग ठरवू की आपण निवडणूक लढवायची की नाही ते. पण आता तयारी करा, सावध व्हा, असे आवाहन त्यांनी समाजाला केले.

monoj Jaranhe - Fadanvis

फडणवीस तुमचं काय वाईट केलं?

या बैठकीत जरांगे यांनी पुन्हा फडणवीस यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला गरिबांची मुलं मोठी व्हावेत असं का वाटत नाही? या सरकारमधील मंत्र्यांना गरिबांची पोरं मोठी होऊ नयेत असं का वाटतं? तुम्हाला फक्त तुमचा पक्ष आणि नेते मोठे करायचे आहेत. देवेंद्र फडणवीस, मराठ्याच्या मुलांनी तुमचं काय वाकडं केलं? मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या विरोधात उभे केले. कुठे केसेस करत आहे, कुठे मराठ्यांचे आमदार विरोधात उभे करता. फडणवीस साहेब तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटत नाही. मी तुम्हाला अजूनही सांगतो, तुम्ही मराठा समाजास आरक्षण द्या. नाहीतर पुढील काळ अवघड असेल, असा इशाराच जरांगे यांनी दिला.

सातत्याने बैल बदलले जातात

तुम्ही ज्या पक्षात काम करत आहे त्या पक्षाचे नेते आम्हाला का आरक्षण देत नाहीत? असा सवाल आता भाजपमधल्या पुढाऱ्यांना त्यांची लेकरं विचारतील असं जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, तुमच्या लेकरांवरील अन्याय कायम डोळ्यासमोर ठेवा. माझ्या विरोधामध्ये भरपूर जण उभे केले आहेत. आठवड्यालाच आमदार बदलतात. अर्थात ते सर्व बैल बदलण्याचे काम केले जात आहे.

मराठ्यांना हारू देऊ नका

भाजपचे नेते तर म्हणतात मी लई खुनशी आहे. मग भाजपचे नेते रात्रीच येतात आणि गोधडीमधून उठवतात आणि हे फडणवीस साहेबांना माहितीच नाही असं जरांगे म्हणाले. भाजपमधील इतकी लोक बाहेर आहेत की एकेदिवशी सगळेच आपल्याकडे येतील. तुम्ही एकदा पाडून ताकत दाखवली. मराठ्यांना हारू देवू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+