Mallikarjun Kharge Statement: महाविकास आघाडीबाबत मल्लिकार्जून खर्गेंचं मोठं वक्तव्य! PM मोदींवर टीका

Mallikarjun Kharge Statement : महाराष्ट्रात महाविकास आघाडी अभेद्य आहे. ती तशीच अभेद्य राहणार आहे. तिला कुणी हलवू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महाराष्ट्राचा स्वाभीमान गहाण ठेवू नका. येत्या विधानसभा निवडणुकीत भरघोस पाठिंबा देऊन महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आणा असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं आहे.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या 'लोकतीर्थ' या स्मारकाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील वांगी येथे झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात खर्गे यांनी सभेत मार्गदर्शन केलं तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरपूस टीका केली.

Mallikarjun Kharge Statement

नेमकं काय म्हणाले मल्लिकार्जून खर्गे?

"महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मजबूत आहे, त्याला कोणीही हलवू शकत नाही. तीन पक्ष मिळून चांगले काम करत आहोत. राहुल गांधी यांनी 'डरो मत'चा संदेश दिला आहे, न घाबरता काम करा. भाजपा युती सरकार गुजरातच्या इशा-यावर काम करत आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी मोदींकडे गहाण ठेवू नका. लोकसभेप्रमाणेच भरघोस पाठिंबा देत विधानसभेला मविआचे सरकार आणा, असे आवाहन करुन महाराष्ट्रात मविआचे सरकार आले की केंद्रातील मोदी सरकारही जाईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले.

घाईघाईत पुतळा बनवल्याने कोसळला

खर्गे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श, प्रेरणास्रोत आहेत पण नरेंद्र मोदींचा हात त्यांच्या पुतळ्याला लागताच पुतळा कोसळला. मोदींनी गुजरातमध्ये पुलाचे उद्घाटन केले तो पडला, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले, त्याला गळती लागली. नरेंद्र मोदी हे मतांसाठी दिखाव्याचे काम करतात. घाईघाईत पुतळा बनवल्याने तो कोसळला व महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान झाला.

मल्लिकार्जून खर्गेंचे 'हे' स्टटमेंट चर्चेत

  • महाराष्ट्राचा स्वाभिमान पीएम मोदीकडे गहाण ठेवू नका
  • महाराष्ट्रात एमव्हिएचे सरकार आणा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये पुलाचे उद्घाटन केले तो पूल पडला.
  • अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले, त्याला गळती लागली.
  • नरेंद्र मोदी हे मतांसाठी दिखाव्याचे काम करतात.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+