Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बारामतीत अजित पवारचं दादा ! माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मोठं यश

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने दणदणीत यश मिळवत 21 पैकी तब्बल 20 जागांवर विजय मिळवला आहे. तर त्यांच्याविरोधात उभा असलेला 'गुरु-शिष्य सहकार बचाव पॅनल' केवळ एका जागेवर समाधान मानत राहिला, ती जागा ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी जिंकली. रंजन तावरे यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे शरद पवार गटाला एकही जागा मिळाली नाही.

Malegaon sugar factory election

या निवडणुकीस अजित पवार यांनी स्वत: उमेदवारी जाहीर करत अध्यक्षपदासाठी नाव सुचवले होते, त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. पवार यांनी प्रचारादरम्यान कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सलग अनेक दिवस दौरे करून सभासदांशी संवाद साधला आणि नाराजी दूर करत पाठिंबा मिळवला.

अजित पवारांची आक्रमक प्रचारशैली आणि स्पष्ट आश्वासने

पवार यांनी प्रचारात आक्रमक भूमिका घेतली. सभांमध्ये त्यांनी सांगितले की, कारखाना संचालकांना कोणतीही खास सवलत मिळणार नाही - वाहन, भत्ता किंवा ड्रायव्हर दिला जाणार नाही. संचालकांना फक्त चहा मिळेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, ऊस दरात वाढ केली जाईल, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा निधी मिळवून दिला जाईल, आणि कारखान्याच्या परिसरातील रस्ते SRF फंडातून विकसित केले जातील - यासाठी सभासदांकडून एकाही रुपयाची मागणी होणार नाही. त्यांच्या या थेट आणि पारदर्शक आश्वासनांनी सभासदांमध्ये उत्साह आणि विश्वास निर्माण झाला, ज्याचा थेट फायदा निवडणुकीत झाला.

विरोधकांचा पराभव आणि मागील बोर्डची निष्क्रियता

मागील कार्यकाळात विरोधी पॅनलमधील चार सदस्य निवडून आले होते - चंद्रराव तावरे, रंजन तावरे, अ‍ॅड. जि. बी. गावडे आणि प्रताप आटोळे. यापैकी प्रताप आटोळे यांनी मध्यंतरात अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र उर्वरित सदस्य बोर्डाच्या अनेक बैठकींना गैरहजर राहिले, कामगार प्रश्नांवर भूमिका घेतली नाही, असे आरोपही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रचारसभांमध्ये स्पष्ट केले. याचा परिणाम म्हणून मतदारांनी यावेळी विरोधकांना नाकारले, असे निरीक्षण नोंदवले जात आहे.

शरद पवार गटाचे अपयश

शरद पवार गटाने सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली 'बळीराजा सहकार बचाव पॅनल'चे 20 उमेदवार मैदानात उतरवले होते. मात्र या उमेदवारांना 500 ते 1000 दरम्यान मते मिळाली असून निळकंठेश्वर पॅनलवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. निकालाने हे सिद्ध केले की, अजित पवारांच्या नेतृत्वाखालील प्रचार अधिक प्रभावी ठरला आणि मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अजित पवारांचा अनुभव, संवादाची रणनीती आणि सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निर्णायक ठरला. या यशामुळे त्यांच्या नेतृत्वाला ग्रामीण सहकारी क्षेत्रात आणखी बळकटी मिळाल्याचे स्पष्ट होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+