महायुतीचं ठरलं! रात्री 1 वाजेपर्यंत नागपुरात दिग्गज नेत्यांची खलबतं!जाणून घ्या काय काय घडलं? वाचा
Mahayuti seat allocation meeting in Nagpur : विधानसभा निवडणुकांची घोषणा या महिन्याच्या शेवटपर्यंत कधीही होऊ शकत. त्यामुळे आधीपासूनच राजकीय पक्ष आपापली रणनिती ठरवत आहेत. त्याधर्तीवर महाविकास आघाडीने तयारी सुरु केली असतानाच आता महायुतीच्या नेत्यांचं राज्यातल्या उपराजधानी नागपूर इथं मध्यरात्रीपर्यंत बैठक चालली. या बैठकीत मोठी खलबतं झाल्याचे समजले असून जागावाटपासंदर्भात चर्चा झाली आहे, असं सुत्रांनी सांगितलं.
भाजपची लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाली. सोबतच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही मोठी कामगिरी करता आली नाही आणि अजित पवारांच्या पक्षाला तर अपयशच पचवावं लागलं. त्यामुळे महायुती सरकार जास्तच सक्रीय झालं असून त्यांच्याकडून आता महाराष्ट्र विधानसभा जिंकण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याच धर्तीवर मध्यरात्रीपर्यंत ही बैठक घेण्यात आली आहे.

ही बैठक नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी रात्री झालीय. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भ भागातील महायुतीचे अन्य काही नेते देखील उपस्थित होते.
काय झालं बैठकीत..?
महायुतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी रात्री आठ वाजता बैठकीला सुरुवात झाली. सर्व नेते पोहचल्यानंतर बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने रणनिती ठरवण्यात आली. विरोधकांच्या नेरेटीव्हला कशाप्रकारे उत्तर द्यायचे. विरोधकांना नेरीटीव्हद्वारे जनमत खेचण्याची संधीच द्यायची नाही या गोष्टींचाही उहापोह झालं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने विदर्भात महायुतीची रणनीती कशी असायला हवी आणि जागा वाटपांच्या सूत्र यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं.
रखडलेल्या विकासकामांसाठी...
नागपूर आणि विदर्भातील काही प्रलंबित प्रकल्प आहेत, ते लवकर मार्गी लागायला हवे या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. आचारसंहिता लागण्यापूर्वी विदर्भातील रखडलेले प्रकल्प आणि इतर योजनांना गती देण्याच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांची चर्चा झाली तसंच महायुतीच्या जागावाटप फार्म्युल्यावरही चर्चा झाली असं समजतयं.
राज्यात काल झारखंड आणि छत्तीसगढ इथले सोळा आमदार आले आहेत. या आमदारांवर भाजपकडून मोठी जबाबदारी सोपवण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतयं. हे आमदार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी निरिक्षकही असू शकतात असंही सुत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. एकंदरीतच आता भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक जिंकण्याचा मोठा निर्धार केला आहे.












Click it and Unblock the Notifications