समृद्धीमुळे खरोखर आलीय समृद्धी; पहा, महायुतीनं महाराष्ट्र नेमका कसा पुढे नेलाय...
Mahayuti Government Dream Project Samriddhi Highway : महायुती सरकारने व विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून विदर्भाला जोडण्याच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाची संकल्पना आणली होती. या संपूर्ण महामार्गासाठी ८,३११ हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्यात आलं. हा महामार्ग अनेक दृष्टीने फायद्याचा तसंच महत्वाचा ठरला आहे. यामुळे मुंबई - नागपूर प्रवासातील अंतर कमी होण्याबरोबर मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला चालनाही मिळलीआहे. वाहतूक, व्यापार, उद्योगासह इथे रोजगाराच्याही संधी आता उपलब्ध होऊ लागल्या आहेत. व्यापाऱ्याच्या दृष्टीने जड वाहतूक जलद गतीने होण्यास या महामार्गामुळे मदत होत आहे.
विदर्भ मराठवाड्याला झाला फायदा
समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा विदर्भाला होताना दिसत आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाड्यातून भाजीपाला, फळं, इतर काही वस्तू जलद वाहतुकीच्या मदतीने मुंबईत पोहोचविल्या जात आहेत. सध्या विदर्भ, मराठवाडा या भागातून मुंबईत भाजीपाला, फळे अशा गोष्टी मुंबई - विदर्भ - मराठवाड्यातील अंतरामुळे योग्य वेळेत पोहोचवणं शक्य होत आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होताना दिसत आहे.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक बदल
या महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधून औरंगाबादला पोहोचण्याचं अंतरही कमी झालंय. समृद्धी महामार्गामुळे औरंगाबादला चार तासांत पोहोचता येतंय. मुंबई- नागपूर या महामार्गाच्या मध्यवर्ती असल्याने औरंगाबादचं औद्योगिक महत्त्व वाढंलंय. जलद वाहतुकीचा मोठा फायदा झालाय. या मार्गावर १९ कृषी समृद्धी केंद्रही उभारण्याचं नियोजन आहे. त्यामुळे शेतकरी ग्राहकांशी जोडले गेलेत आणि कृषी आधारित अर्थव्यवस्था वाढलीय.
कृषी समृद्धी केंद्राने सुधारणा
कृषी समृद्धी केंद्रामुळे कृषी आधारित संधी उपलब्ध होतील. इथे औद्योगिक केंद्र उभारली जाऊन आर्थिक विकास होण्यास मदत होईल. औद्योगिक विसाकासाठी मनुष्यबळ याच महामार्गातील परिसरातून उपलब्ध व्हावं यासाठी स्थानिकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे केवळ औद्योगिकच नाही, तर इथे निवासी आणि व्यावसायिक विकासही होईल. मालवाहतुकीला सर्वाधिक फायदा झालाय. या मार्गावरुन जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटीपर्यंत शेतमाल पोहोचवणं सहज शक्य होताना दिसत आहे.
भारतातील पहिला हाय स्पीड हायवे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं या महामार्गाचं नाव आहे. या महामार्गामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून पर्यटनालाही चालना मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षणीय स्थळं जोडण्यास हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. हा महामार्ग नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद या प्रमुख बाजारपेठेला जोडला गेला असून हा एक्सप्रेसवे भारतातील पहिला हाय स्पीड हायवे आहे.
ग्रीनफिल्ड समृद्धी महामार्ग
नागपूर - मुंबईला जोडणारा हा सर्वाधिक लांबीचा ग्रीनफिल्ड समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरताना दिसत आहे. हा महामार्ग नागपुरातील शिवमडका गावापासून ठाणे जिल्ह्यातील आमने गावाला जोडला आहे. हा महामार्ग सहा पदरी असून या मार्गावर प्रत्येकी ५ किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि विनाशुल्क दूरध्वनी सेवेची सुविधा आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळेच अनेक दृष्टीने रोजगाराच्या संधी यातून उपलब्ध होतील. तसंच महामार्गात हॉटेल्स, मॉल, दवाखानेही उभारले जात आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रावरही परिणाम
मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग, ज्याला समृद्धी महामार्ग म्हणूनही ओळखले जाते, त्याचा रिअल इस्टेट क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होताना दिसत आहे. मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे एक्स्प्रेस वेवर रिअल इस्टेटची मागणी वाढली आहे. अनेक मोठे व्यापारी या महामार्गाच्या आसपास आपले प्रोजेक्ट आणतील, अशीही चर्चा आहे.












Click it and Unblock the Notifications