Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Weather : पुढील 4 दिवस हवामानाचा अंदाज; विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा 'यलो अलर्ट'

Maharashtra Weather Update : आज, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांसह विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. पुढील चार दिवसांत राज्याच्या विविध भागांत पावसाची स्थिती कशी असेल, याचा सविस्तर अंदाज खालीलप्रमाणे:

पुढील ४ दिवसांसाठी हवामानाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवणार आहे.

तापमानात घट : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवसांमध्ये कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

ढगाळ वातावरण : बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे.

पावसाचा जोर : पावसाचा जोर हळूहळू दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणाकडे वाढणार आहे.

maharashtra weather alert august 4

जिल्ह्यानुसार 'यलो अलर्ट' आणि पावसाची स्थिती

पुढील दोन दिवसांसाठी काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहण्याची शक्यता आहे.

४ ऑगस्ट : नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

५ ऑगस्ट : वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली येथे पाऊस अपेक्षित आहे.

६ ऑगस्ट : बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस झाल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस काहीसा कमी झाला होता. पण आता पुन्हा एकदा काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.

विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील, त्यानंतर पाऊस ओसरण्याची शक्यता आहे. तळ कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर हळूहळू वाढेल, असा अंदाज आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+