महाराष्ट्रात वादळी वा-यासह पाऊसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
maharashtra weather update : राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हवामानात बद्दल होत आहे. काही जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. राज्यात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर पाऊस पडण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. विदर्भात मात्र, तापमान वाढताना दिसतं आहे. चंद्रपूरच्या ब्रह्यपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
सध्या किनारपट्टी भागात कधीही पाऊस पडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ढगाळ हवामानामुळे आंब्यावरती सुद्धा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. तसेच किनारपट्टी भागात ताशी 40 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या किनारपट्टी भागात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान, एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या जिल्ह्यात वादळी वा-यासह पावसाची शक्याता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर,सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या सर्व जिल्हांना हवामान खात्याने येलो जारी केला आहे. 1 एप्रिल रोजी पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications