Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Weather Update :मध्य महाराष्ट्र, विदर्भावर अवकाळी संकट, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार!

Maharashtra Weather Update : जळगाव जिल्ह्यात पावसाने चांगलाच झोडपा दिला असून शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच काल काही ठिकाणी पाऊस झाला असून आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाचा येलो अलर्ट

महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आज आणि उद्या हवामान विभागाने व्यक्त केली आहे अशातच दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडू शकतो, तर विदर्भातही आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, यादरम्यान मेघगर्जना आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

Maharashtra Weather Update

मराठवाडा, कोकणमध्ये कसे राहील हवामान?

आज आणि उद्या मराठवाड्यातील सातही जिल्ह्यात आणि कोकण विभागात हवामान कोरडे राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

  • गेल्या २४ तासांतील हवामान
  • गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते.
  • मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
  • उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या आसपास होते.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) ३३.८. सांताक्रूझ ३३.५. अलिबाग रत्नागिरी ३३.०. पणजी (गोवा) ३४.६, डहाणू ३४.९. पुणे ३७.७, लोहगाव ४०.९, अहिल्यानगर जळगाव ३८.५. कोल्हापूर ३५.८, महाबळेश्वर ३०.३. मालेगाव ४०.६. नाशिक ३५.४. सांगली ३७.६, सातारा ३७.२. सोलापूर ४०.२, धाराशिव छत्रपती संभाजीनगर ४१.४. परभणी ३९.५. नांदेड बीड अकोला ४०.२. अमरावती ३९.६, बुलढाणा ३८.६, ब्रह्मपुरी चंद्रपूर ४२.६, गोंदिया ३९.६, नागपूर ४१.१. वाशिम ४१.०, वर्धा ३९.८, यवतमाळ ३९.५.

रावेर, मुक्ताईनगर व बोदवड आणि जळगाव तालुक्यात गारपीट

  • जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर व बोदवड आणि जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान झाले.
  • विशेषतः रावेर शहरासह भोकर, भादली खुर्द परिसरामध्ये तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही केळी आणि मका या नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.
  • अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वादळामुळे बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
  • प्रशासनाच्या मदतीने तत्काळ एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून, वीज वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे. उन्हाच्या तडाख्यानंतर थोडासा गारवा अनुभवास आला असला तरी गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून काही शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.
  • या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+