Maharashtra Weather : महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांत कशी असेल थंडी? धुळ्यात पारा नीचांकी 8.5 अंशावर
Maharashtra Weather Update : नव्या वर्षात महाराष्ट्रात थंडीने जोर धरला आहे. महाराष्ट्रात नऊ जानेवारीपर्यंत थोडीफार थंडी होती मात्र यानंतर थंडीत वाढ होताना दिसत आहे तर दुसरीकडे तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी थंडी दुपारी उष्णता अशी स्थिती आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, सातारा सांगली येथे पहाटेचे तापमान घसरले आहे. तिथे किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सियसची वाढ जाणवली.

येत्या पाच दिवसांत थंडी कशी असेल?
महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यात थंडीचा प्रभाव जाणवणार आहे तर मराठवाडा, खांदेश, कोकणात तापमान सरासरीइतके किंवा अंशतः वाढ होण्याची संभावना आहे. तर अलनिनोचा प्रभावामुळे येत्या पाच दिवसांत मराठवाडा, कोकण, खांन्देशात थंडी जाणवणार आहे. यानंतर मात्र तापमान वाढताना दिसून येईल असा अंदाज आहे.
उत्तर भारतात कशी आहे थंडी?
डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंडी सतत वाढत आहे. हवामान खात्यानुसार, नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे या आठवड्यात दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसानंतर तापमानात थोडीशी वाढ होऊ शकते, परंतु त्यानंतर कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागेल. थंडीची लाट, थंडीचे दिवस आणि दाट धुके यांच्यात आता पाऊसही त्रासदायक ठरणार आहे.
जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे मैदानी भागात थंडीचा कहर वाढला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार आणि राजस्थानसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वाढत्या थंडीमुळे लोकांना बर्फाळ वारे आणि थंडीच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.
दिल्लीत हलक्या पावसाची शक्यता
दिल्लीत हलक्या पावसाची शक्यता आहे, हवामान खात्याने यामध्ये इशारा दिला आहे. राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशाराही जारी करण्यात आला आहे. 22 आणि 23 जानेवारी रोजी दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे थंडीची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच राजस्थानच्या चुरू, सीकर, श्रीगंगानगर, हनुमानगड, बिकानेर, झुंझुनू, अलवर आणि भरतपूर या 8 जिल्ह्यांमध्ये दाट धुके असेल, त्यामुळे तापमानात घट होईल.












Click it and Unblock the Notifications