Maharashtra Weather Update : पुढील 48 तास महत्वाचे, 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
मुंबई : मागील 48 तासापासून मराठवाडा आणि विदर्भात पावासाने धुमाकूळ घातला आहे. पुढील 24 तास मराठवाडा आणि विदर्भाला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील 48 तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या अरबी समुद्राच्या वायव्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, त्याचा हा परिणाम दिसून येत आहेत. देशभरात सक्रिय असणाऱ्या हवामान प्रणालीचे थेट परिणाम मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर दिसून येत आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट
छत्रपती संभाजीनगर, जालना,बीड, परभणी,धाराशिव, लातूर परभणीसह सातारा आणि पुण्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला
शनिवार पासून सुरु झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाडा, विदर्भ अनेक भागात महापूर आला असून काही गावंचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे शेतक-याचं मोठं नुकसान झालं आहे. शेतशिवारात पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे . सोमवारी झालेल्या या पावसामुळे सदर भागात जनजीवन विस्कळीत झालं.












Click it and Unblock the Notifications