पुण्यासह राज्यात पावसाचा जोर ओसरला, पण 'या' जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई : राज्यात मागील दोन दिवसापासून पावसाने थैमान घातलं आहे. अनेक जिल्ह्यात पुरपरिस्थिती आहे . पुणे,मुंबई, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. 27 जुलैपर्यंत काही जिल्हात मुसळधार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 25-27 जुलैपर्यंत राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात गुरुवारी एकाच दिवसात 7 जणांचा मृत्यू झाला होता.
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूरतील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळं नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले होते. तर, कल्याणमध्येही उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडल्याने शहरात नदीचे पाणी शिरले होते. दोन्ही मार्ग बंद ठेवण्यात आले होते. मुंबईत शुक्रवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईतील शाळा, महाविद्यालय आज सुरु राहणार आहे. दरम्यान पुण्यासह आठ जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे.

या जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी
राज्यात 25 जुलै गुरुवार रात्रीपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. त्यानंतर आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालये सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड,पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा समावेश आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
25 जुलै ते 27 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. आजही हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मध्यम ते स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. 27 जुलैनंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईत रात्रभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असून पहाटे चार वाजेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.












Click it and Unblock the Notifications