सावधान! विदर्भात उष्णतेची लाट येणार! अकोल्यात पारा तब्बल 43.2 अंशावर, महाराष्ट्रातील तापमानात वाढ
Maharashtra Weather update : महाराष्ट्रातील तापमानात चांगलीच वाढ झाली असून काल परवा कमी असलेला पारा झटकन वरच्या दिशेने सरकत आहे. जवळपास दोन ते तीन अंशांनी तापमान वाढत आहे. विदर्भात उद्या 9 एप्रिलला उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान अकोल्यात पारा तब्बल 43.2 अंशावर पोहचला असून त्या खालोखाल नागपूर, अमरावती, चंद्रपूर, ब्रम्हपूरी येथील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उष्णतेची खरी झळ कालपासून महाराष्ट्राला बसत आहे.

महाराष्ट्रातील तापमनात वाढ
ठळक घडामोडी (सकाळी ०८३० वाजता)
- एक कमी दाबाचा पट्टा उत्तर मध्य महाराष्ट्र ते दक्षिण अंतर्गत कर्नाटक पर्यंत (उत्तर अंतर्गत कर्नाटक मार्गे) जात आहे.
- गेल्या २४ तासांतील गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.
- कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानात सरासरीच्या आसपास होते.
गेल्या २४ तासांत प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३३.७, सांताक्रूझ ३३.८, अलिबाग, रत्नागिरी ३३.४, पणजी (गोवा) ३४.२, डहाणू ३६.१, पुणे ३९.२, लोहगाव ४१.०, अहिल्यानगर, जळगाव ४२.५, कोल्हापूर ३८.१, महाबळेश्वर ३२.१, मालेगाव ४०.८, नाशिक ४०.२, सांगली ३८.३, सातारा ३८.५, सोलापूर ४१.४. धाराशिव ३९.२, छत्रपती संभाजीनगर ४०.२, परभणी ४०.७, नांदेड ४०.५, बीड, अकोला ४३.२. अमरावती ४२.६, बुलढाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४२.९, चंद्रपूर ४२.६, गोंदिया ४०.४, नागपूर ४२.२, वाशिम ३७.८. वर्धा ४१.१, यवतमाळ ४२.४.
कालच्या तुलनेत आज दोन अंशांनी तापमानात वाढ
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात काल ७ एप्रिल रोजी तापमानाने ४० अंशांचा आकडा गाठला होता. यामध्ये अकोला ४० तर ब्रम्हपुरीत तापमान ४१.३ अंश सेल्सियस इतक होते. तेच तापमान आज ४३ अंशावर गेले आहे म्हणजेच तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली. सर्व विदर्भातील जिल्हे आणि मराठवाड्यातही तापमानात वाढ झाली आहे. तसेच कालपासून राज्याच्या काही भागात उष्णता वाढली आहे. सध्या उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आजपेक्षाही येत्या काही दिवसांत पारा आणखी चढणार आहे.
उन्हापासून कसे करावे संरक्षण?
- सुती कपडे: सुती कपडे उन्हात हवा खेळती राहते, ज्यामुळे उष्णता कमी जाणवते.
- सनस्क्रीन: सनस्क्रीन त्वचेला हानिकारक UV किरणांपासून वाचवते, त्यामुळे बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.
- टोपी किंवा छत्री: डोके आणि मान उन्हापासून वाचवण्यासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
- कडक उन्हात प्रवास टाळा: शक्य झाल्यास, कडक उन्हात प्रवास टाळा.
- हलके रंग : उन्हाळ्यात हलक्या रंगाचे कपडे घाला, कारण ते उष्णता कमी शोषून घेतात.
- कडक उन्हात गाडीत बसू नका : उन्हात गाडीत बसल्यास गरम होऊ शकते, म्हणून गाडीत बसण्यापूर्वी खिडक्या उघडा.
- कडक उन्हात व्यायाम टाळा : कडक उन्हात व्यायाम केल्यास उष्णतेने आजारी पडण्याची शक्यता असते.
- केसांची काळजी : उन्हात केस कोरडे होऊ शकतात, म्हणून नियमितपणे केस तेल लावा आणि केस कोरडे होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्या.
- आहार : उन्हाळ्यात फळभाज्या आणि पाण्याचे प्रमाण वाढवा.
उन्हाळ्यात पाणी किती प्यावे?
उन्हाळ्यात पाणी पीत राहणं गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञ उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते. काही प्रमाणात पाणी यकृत, फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू, स्नायू आणि हाडे तसेच शरीराच्या इतर अनेक अवयवांमध्ये देखील साठवले जाते, हे त्यांचे कार्य चालवून ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात सातत्याने पाणी पित राहणे हे आरोग्यासाठी देखील अतिशय फायद्याचे असते.












Click it and Unblock the Notifications