Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Weather Update: राज्यात ढगाळ वातावरण! कुठे पाऊस कुठे गारपीट होणार? जाणून घ्या हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात ढगाळ वातावरण असून मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत, तसेच पश्चिम महाराष्ट्रात आणि काही ठिकाणी आज गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासह काही भागात पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Update

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीटीचा इशारा

हवामान विभागाने आज आणि उद्या येलो अलर्ट दिला आहे. त्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट होऊ शकते तसेच आगामी दहा मे पर्यंत तापमान घसरलेलेच राहील या काळात पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला. दरम्यान, सातारा जिल्ह्यात 7 मे रोजी गारपीट आणि वादळी पावासाची शक्यता असलाने इथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. पुण्यातही गारपिटीची शक्यता आहे. पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असे सांगण्यात आले तर मुंबईतही सध्या पाऊस पडत आहे.

पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

भारतीय हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्यासाठी आ येलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार सध्या पालघर जिल्ह्यातल्या बोईसर सह अनेक भागात वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधल्या अनेक मच्छीमार बोटींचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरीत आज बरसला पाऊस

रत्नागिरीत आज (7 मे) पहाटे तीननंतर जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला. आंबा-काजूच्या पिकांसाठी हा पाऊस हानिकारक ठरणार आहे.

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस

जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातसलग दुसऱ्या दिवशी दिवसभर मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे मागच्या काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या जिल्हा वासियांना दिलासा मिळाला. अवकाळी पावसामुळ वातावरणात गारवा निर्माण झाला. काही प्रमाणात गारपीट ही झाली.

अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली काही ठिकाणी पत्री उडाले काही ठिकाणी झाडं कोसळल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली.

अनेक केळीबागा जमीनदोस्त झाल्या. ऐन कापणीवरील केळीबागांचा तोंडी आलेला उत्पन्नाचा घास नियतीने हिरावून घेतल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे.
गत पंधरवड्यापासून 44 ते 45 सेल्सिअंश तापमानाची झळ उष्ण वाऱ्यामुळे 46 ते 47 सेल्सिअंशच्या उष्ण तपमानाप्रमाणे बसल्याने केळीबागा होरपळून निघाल्या होत्या. त्यामुळे असह्य उष्ण तपमानात काहूर झालेल्या केळीबागांना वादळी वेगवान वाऱ्यांसह अकाली पावसाने झोडपले.

नाशिक जिल्ह्यात काल पाऊस

नाशिक जिल्ह्यात आज दुपारनंतर जवळपास सर्वच भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी कांदा चाळींवरील पत्रे उडाले, तर काढून ठेवलेला कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. या पावसामुळे कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील सुरगाणा, चांदवड, कळवण, त्र्यंबकेश्वर, सटाणा, येवला, पेठ, कळवण, निफाड, मनमाड , मालेगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला, तर इतर तालुक्यांमध्ये सुमारे अर्धा तास पाऊस झाला. या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+