गणरायाच्या स्वागताला पाऊस धुमाकूळ घालणार, राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
Maharashtra Weather Update : आज संपूर्ण राज्यात गणरायाचं आगमन होत आहे. गणरायाच्या आगमनच्या दिवशीच राज्यातील अनेक जिल्हात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर काही जिल्हांना पावसाचा अलर्ट सुध्दया देण्यात आला आहे. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसांपुर्वी मुसळधार पावसाने चांगलचं झोडपून काढलं होतं. त्यामुळे शेतक-याचं अतोनात नुकसान झालं होतं.
बंगलाच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आजपासून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ते खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागाने अंदाजानुसार आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेत विदर्भातील नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई पुण्यातही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी मुंबई आणि पुणे आणि परिसरात आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे गणरायाचं स्वागत करताना गणेश भक्तांची तारांबळ उडू शकते. मुंबई, ठाणे आणि पालघरच्या परिसरात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळतील. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहील आणि शहरासह उपनगरात अधूनमधून मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
हवामान विभागाने जाहिर केलेल्या अंदाजानुसार राज्यातील पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्याला पावासाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर












Click it and Unblock the Notifications