राज्यातील 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
Maharashtra Weather Update : राज्यातील रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. साताऱ्यातही आज घाट माथ्यावर अतिमुसळधार आणि इतर भागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार असून रेड अलर्ट देण्यात आला आहे.त्यामुळे, या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई शहर आणि उपनगर येथे अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील काही तास मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस होणार आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
#WATCH | Maharashtra: Rain lashes parts of Mumbai
— ANI (@ANI) July 22, 2024
(Visuals from Western Express Highway) pic.twitter.com/KuBFDKK8Nj
पुण्यातही आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुणे, रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील आणखी 1-2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications