राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आता पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दोन तीन दिवसापासून काही भागात ढगाळ वातारवणासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभरात पुढील 24 ते 48 तासात हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मात्र 16 आणि 17 सप्टेंबर रोजी राज्यभर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे, आकाश अंशतः ढगाळ राहील.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 26°C च्या आसपास राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर काय राहणार
मराठवाडा आणि विदर्भात 16 आणि 17 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतक-यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य भारतातील कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे गेला असून, त्यापाठोपाठ आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टा निर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात पाऊस आता ओसरताना दिसतोय. दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल आणि त्या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच गुजरातच्या दक्षिणेपासून कर्नाटकापर्यंतही हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे त्याचे कमीजास्त प्रमाणात महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम दिसू शकतात.












Click it and Unblock the Notifications