Maharashtra Rain : दुसरा सणावर पावसाचं संकट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
मुंबई : मागील आठवड्यापासून राज्यात परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यांना चांगलेच झोडपून काढलं आहे. ऑक्टोबर महिन्यात उन्हाचे उटके बसत असल्याने उकाडा वाढला आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पालघर,ठाणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना सुध्दया पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, पुणे या जिल्हात मागील दोन दिवसापासून मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. तर आज ही या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरीत महाराष्ट्रात काही ठिकाणी अगदी तुरळक पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
परतीच्या पावसाने शेतक-यांच्या सोयाबीन पीकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या वेगळीच चिंता आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात रब्बी पिकाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. तरी शेतक-यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications