Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

maharashtra weather update : पुन्हा परतीचा पाऊस, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राला पुन्हा एकदा परतीच्या पावसाने चांगलचं झोडपून काढलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काल कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, अहिल्यानगर या जिल्हांना परतीच्या पावसाने चांगलेचं झोडपून काढले आहे. या परतीच्या पावसाने काढणीला आलेलं शेतक-यांच्या पीकाचं मोठं नुकसान झालं आहे.

आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघरमध्ये या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरादारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

maharashtra weather update

दरम्यान हवामान विभागाकडून मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रातील जिल्हांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलढाणा,अकोला, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात ही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्हांना पावसांचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील अकोला जिल्हातील काही भागात काल आणि आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्हातील काही भागात परतीच्या पावसाने जोरदार कोसळला आहे. मुर्तीजापूर येथे विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला आहे. शेतात काम करणा-या 23 वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू आहे. मागील 24 तासात परतीच्या पावसामूळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठं संकट आलं आहे. तसेच अनेक भागात काढणीला आलेले सोयाबीन पिकांच मोठं नुकसान झालं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+