70 दिवसांत पावसामुळे राज्यात 97 जणांचा मृत्यू! 24 तासांत राज्यात काय काय घडलं! जाणून घ्या
मुंबई - पावसाने मुंबईसह आता राज्यात जोरदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासात ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर गंभीर बाब म्हणजे १५ मे ते आजपर्यंत सत्तर दिवसांत ९७ जणांचा मृत्यू झाला असून १३२ जण जखमी झाले आहेत.
या चोवीस तासात राज्यात पावसामुळे काय काय घडलं हे जाणून घेऊया.

या आहे अपडेट्स
- भारतीय हवामान विभागाकडून काल राज्यातील (पालघर, रायगड, पुणे, सातारा) या (04) जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानंतर जोरदार पाऊस झाला.
- आज पुढील 3 तासात राज्यातील ठाणे, रायगड, सातारा, पुणे, मुंबई, मुंबई शहर या 6 जिल्हयांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.
- पालघर, अहमदनगर, रामागिरी, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेडमध्ये ऑरेंज अलर्ट
- गेल्या 24 तासात मुंबई आणि मुंबई उपनगर वगाहून राज्याचे सरासरी पर्जन्यमान 33.7 मिमी
- मुंबई व मुंबई उपनगर येथे अनुक्रमे 62.5 मिमी व 86.1 मिमी पाऊस
- महाराष्ट्रात 1 जून ते आजपर्यंत 619 मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे.
- 15 मे ते आजपर्यंत 97 लोकांचा मृत्यू, 132 लोक जखमी
- महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 24 तासात 4 व्यक्तींचा मृत्यू, 1 व्यक्ती जखमी
- पुण्यामध्ये न्होपात्रात वाढ झाल्याने अंडा भुर्जीची गाडी हलवताना विजेचा शॉक लागून 3 व्यक्ती मृत्युमुखी
- मौजे आदरवाडी, तालुका मुळशी येथे। व्यक्ती दरड कोसल्यामुळे मृत्युमुखी
- लवासा येथे एक घरावर दरड कोसळली आहे. प्राथमिक अंदाजानुसार कोणीही अडकल्या असल्याची माहिती अद्याप अप्राप्त. शोध बचावासाठी पाठक रवाना करण्यात आले आहेत.
- सुरक्षित स्थळी स्थलांतरी केलेल्या नागरिकांची सांख्या तपशील (जिल्हा) पुणे व कोल्हापूर जिल्यांमध्ये सखल भागत पाणी साचल्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.
- जल संपदा विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या अहवालानुसार राज्यातील सर्व धरणाचा उपयुक्त पाणीसाठा हा 52.1% इतका आहे.
- कुंडलिका (रायगड), आंबा (रायगड), सावित्री (रायगड), जगबुडी (रत्नागिरी) नद्यांची धोका पातळीच्या वर वाहत आहे.
- पाताळगंगा (रायगड) व पंचगंगा (कोल्हापूर) इशारा पातळी वर चाहत आहे.
दरड कोसळली, उपाययोजना सुरु
पुणे जवळील लवासा व ताम्हिनी येथे दरड कोसळली. उद्भवलेल्या या परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून त्यांना आवश्यक सुविधा भोजन व निवास याबाबतची व्यवस्था करण्याच्या सुचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई उपनगरात जोरदार पाऊस येथील जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन व विकास निधीमधून खर्च करण्याबाबतचे निर्देश वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात विसर्गाचा परिणाम
धरणाचा साठा 75 टक्क्यापर्यंत पोहोचल्यामुळे सदर धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा परिणाम सांगली जिल्ह्यामध्ये होवू शकतो. त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये NDRF आवश्यक साहित्यासह तैनात करण्यात आले आहे.
NDRF च्या टिम तैनात
- राज्यातील पूर्व अनूभव विचारात घेवून राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याकरीता बचाव कार्यासाठी SDRF व NDRF च्या टिम पूर्व तैनात करण्यात आल्या आहेत.
- राज्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , देवेंद्र फडणवीस, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वारंवार आढावा घेण्यात येत आहे.
- पालघर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आज जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
- मंत्रालयातून राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा










Click it and Unblock the Notifications