Maharashtra Rain : पावसाची दुसरी इनिंग सुरू, महाराष्ट्राला पुढील 5 दिवस वादळी पावसाचा इशारा!
Maharashtra rain alert August 2025 : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर, आता महाराष्ट्रात पावसाची दुसरी इनिंग सुरू होत आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि राजस्थान तसेच पंजाबमधील चक्राकार वाऱ्यांमुळे, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा (Yellow Alert) दिला आहे.

२५ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २५ ऑगस्टपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
आज (२३ ऑगस्ट):
रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट.
धाराशिव, लातूर आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
उद्या (२४ ऑगस्ट):
रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली येथे यलो अलर्ट.
23 Aug, 1.25 pm, Possibility of light to mod thunderstorms during next 3,4 hrs at isolated places over Maharashtra including ghat areas as seen from the latest satellite obs
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 23, 2025
Pl watch IMD alerts. pic.twitter.com/vHqtZy34QH
२५ ऑगस्ट:
विदर्भ: संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट.
मराठवाडा: हिंगोली, परभणी, नांदेड, आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज.
कोकण आणि मध्य महाराष्ट्र: रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर यलो अलर्ट.
२६ ऑगस्ट:
विदर्भ: संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट कायम.
कोकण व मध्य महाराष्ट्र: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट.
२७ ऑगस्ट:
कोकण व मध्य महाराष्ट्र: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट.
विदर्भ: बुलढाणा, अकोला, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही पावसाचा यलो अलर्ट.
शेतकरी आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
शेतकऱ्यांसाठी: पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस अपेक्षित असल्याने, शेतमालाची काळजी घेणे आवश्यक आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत.
नागरिकांसाठी
वादळी वाऱ्यासह पाऊस येणार असल्याने, प्रवासात काळजी घ्यावी. जुन्या आणि धोकादायक इमारती तसेच झाडांखाली थांबणे टाळावे. पाणी साचणाऱ्या सखल भागात जाणे टाळावे.
प्रशासनासाठी
प्रशासनाने संभाव्य पूरसदृश परिस्थिती आणि इतर आपत्कालीन स्थितीसाठी तयार राहावे.
एकंदरीत, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील हवामान अस्थिर राहणार असून, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications