Maharashtra Weather: विदर्भात उन्हाचा कडाका! अकोल्यात पारा 45 पार, सर्व जिल्ह्याचे तापमान जाणून घ्या
Maharashtra Weather : महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यात पारा चाळीशीपार पोहचला आहे. अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात पारा ४४ ते ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. विदर्भात अंगाची लाहीलाही होईल असे तापमान आहे.
एकीकडे विदर्भ तापला असतानाच राज्यातील थंड हवेच्या ठिकाणीही तापमान उष्णच आहे जवळपास सर्वच जिल्ह्यात दोन ते तीन अंशांनी तापमानात गेल्या तीन ते दिवसांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान हवामान विभागाने उष्ण वातारवणासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

विजेचा वापर वाढला
वाढत्या तापमानाच्या धर्तीवर राज्यात विजेचा वापर चांगलाच वाढला आहे. नागरिक उकाड्याने त्रस्त असून विदर्भात घराबाहेर संध्याकाळी सहानंतरच नागरिक पडत आहेत.
मराठवाड्यातील तापमान
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात तापमानाचा पारा जवळपास ४४ अंशापर्यंत पोहचला आहे धाराशिव ४२.८. छत्रपती संभाजीनगर येथे ४२.२, परभणीत ४४.१, नांदेडमध्ये आणि बीड येथे ४३.४. अंश सेल्सियस तापमान आहे.
मध्य महाराष्ट्रातील तापमान
मध्य महाराष्ट्रात जवळपास पारा ४२ अंशावर गेला आहे. सर्वात जास्त तापमान सोलापूर नंतर पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक येथे आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३३.६, सांताक्रूझ ३३.७ अलिबाग ३५.२, रत्नागिरी ३४.१, पणजी (गोवा) ३५.४. डहाणू ३६.३, पुणे ४१.२, लोहगाव ४३.६, अहिल्यानगर ४०.९. जळगाव ४३.०, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्वर ३३.४. मालेगाव ४३.०, नाशिक ४०.२. सांगली ३९.३, सातारा ४०.७, सोलापूर ४३.८, धाराशिव ४२.८. छत्रपती संभाजीनगर ४२.२, परभणी ४४.१, नांदेड बीड ४३.४. अकोला ४५.०, अमरावती ४४.६, बुलढाणा ४०.७. ब्रह्मपुरी ४५.६, चंद्रपूर ४५.५. गोंदिया ४२.५, नागपूर ४४.४, वाशिम ४३.०. वर्धा ४४.७. यवतमाळ ४३.८.
उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?
उन्हाळ्यात उष्माघाताचा मोठा त्रास होत असतो आणि अशा स्थितीत उन्हात गेल्यास उष्माघात, पोटात जळजळ, उलटी, चक्कर अशक्तपणा अशा समस्या होऊ शकतात, त्यामुळे उष्माघात आणि या समस्या टाळण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
- उष्माघात टाळायचा असेल, तर तुम्ही कांद्याची साल खिशात ठेवू शकता.
- शरीराचे तापमानही कमी होण्यासाठी ताक, दही, रस, उसाचा रस, भाजीचा रस, फळांचे रस इत्यादी द्रवपदार्थ उष्माघात झाल्यावर प्यावे.
- उष्माघात होऊ नये म्हणून कोणती विशेष काळजी घ्यावी
- उष्माघात हा उष्णतेमुळे होतो, म्हणून उष्णतेपासून स्वतःचा बचाव करावा.
- कडक उन्हात बाहेर फिरू नये.
- कॅफीन आणि मद्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
- काळे, जाड आणि अंगाला चिटकून कपडे वापरू नका.
- शरीरात उष्णता निर्माण करणारे अन्न आणि उष्ण पेये यांचे सेवन करणे टाळावे.












Click it and Unblock the Notifications