19 विहिरी 6 कुंड 34 जलाशयांचे संवर्धन, राज्यात आदिशक्ती अभियान; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 10 निर्णय!
Maharashtra Cabinet Meeting, Ahilyanagar : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती सोहळ्यानिमित्त, महायुती अर्थात फडणवीस सरकारने प्रथमच अहिल्यानगरच्या चौंडीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन केले.
आजच्या 6 मे 2025 रोजीच्या या कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले.
बैठकीच्या निमित्ताने चौंडीला स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धन करण्यासाठी 681 कोटी रुपयांचा आराखडा मान्य केलाय. या निधीतून विविध प्रकारची कामं होतील असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले निर्णय! Maharashtra State Cabinet Meeting 10 Major Decisions
- अष्टविनायक मंदिरासाठी 147 कोटी रुपये
- तुळजापूर मंदिरासाठी 165 कोटी रुपये
- नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी 275 कोटी रुपये
- सोबतच विदर्भातील माहूरगड विकास आराखड्यासाठी 829 कोटी रुपये
- असे एकूण 5 हजार 520 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलीय. सोबतच मुलींचे स्वतंत्र आयटीआय देखील उभारले जाणार आहे.
राज्यात आदिशक्ती अभियान
राज्यात महिला सक्षमीकरणासाठी सरकार आदिशक्ती अभियान राबवणार आहे. समाजात संवेदनशीलता निर्माण करणे आणि जागृती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. जे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले तेच काम आमचं सरकार करणार आहे. अहिल्यादेवींचे जीवन आणि कार्याचा सन्मान झाला पाहिजे, यासाठी चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. तो चित्रपट बहुभाषिक असेल. शिवाय हा केवळ जीवनपट नसेल तर प्रभावी मांडणी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
यशवंत योजना, नामांकित शाळांमध्ये प्रवेश
आज बैठकीच्या निमित्ताने चौंडीला स्मृतीस्थळाचे जतन करण्यासाठी 681 कोटी रुपयांचा आराखडा मान्य केलाय. अखिल भारतीय स्थरावर प्रेरणा आणि तीर्थस्थळ तयार झाले पाहिजे, असं काम आपण केलंय. समाजात संवेदनशीलता निर्माण करणे आणि जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिला केंद्रीत एनजीओ उभा करण्याचे काम हाती घेतले आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा यासाठी यशवंत योजना सुरु केली आहे. आता 10 हजार विद्यार्थी आपण यातून शिकवणार आहोत. सोबतच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह योजना सुरु करत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
19 विहिरी 6 कुंड 34 जलाशयांचे होणार संवर्धन
अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या विहिरींसाठी जलसंधारण विभागाने हाती काम घेतलंय ज्यात त्यांचे पुनरुज्जीवन आपण करणार आहोत. ज्यामध्ये 19 विहिरी 6 कुंड 34 जलाशयाच्या संवर्धनाचे काम करणार आहोत. सोबतच राहुरी दिवाणी न्यायालयाला ही मान्यता दिली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला मेळावा होतो त्यात कुंभमेळा प्राधिकरणाच्या कायद्याला मंजुरी दिली आहे. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीनिमित्ताने डाक तिकीटसह प्रेरणा गीत देखील जारी केलंय. ज्याप्रकारे या देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या माध्यामातून केलं गेलं त्याच पावलावर पाऊल टाकत सरकार पुढे जात आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.












Click it and Unblock the Notifications