..हा जनतेचा कौल नाही, आम्ही हे मानायला तयार नाही, संजय राऊत यांचा मोठा आरोप

Maharashtra Result 2024- हा निकाल म्हणजे जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल आहे, असा मोठा आरोप शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केला आहे. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल यायला सुरुवात झाली. निवडणुकीच्या कलानुसार महायुतील सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. त्यानंतर खा. राऊत यांनी हा आरोप केला. या निवडणुकीत पैशाचा मोठा वापर झाल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut

महायुतीला स्पष्ट बहुमत

सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरु झाली. त्यात सुरुवातीच्या कलानुसार २८८ पैकी २०४ जागांवर महायुती आघाडीवर होती. महाविकास आघाडीला फक्त ५० च्या आसपास जागांवर आघाडी दिसत होती. महायुतीत भाजप ११५ जागांच्या आसपास आघाडीवर दिसतोय. शिवसेना शिंदे गट ५८ तर अजित पवार गटही ३५ जागांच्या आसपास आघाडीवर दिसत होता.

महाविकास आघाडीचा सुपडा साफ

महाविकास आघाडी फक्त ४७ जागांवर आघाडीवर दिसत आहे. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत मविआने सपाटून मार खाल्लेला दिसत आहे. काँग्रेस २०, शिवसेना उद्धव ठाकरे गट १८ तर राष्ट्रवादी शरद पवार गट फक्त १० जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. या कलानंतर संजय राऊत यांनी हे भाष्य केले.

काय म्हणाले संजय राऊत

या सगळ्या निकालावर खा. संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, हा कौल जनता कसा स्विकारेल..? राज्यात शरद पवारांचे वादळ असताना त्यांना दोन अंकी संख्याही पार करता येत नाही. हा जनतेचा कौल नाही. आम्ही हे मानायला तयार नाही, असं खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीत जय-पराजय मिळत असतो मात्र आम्हाला ७५ जागाही मिळताना दिसत नाही, असंही खा. राऊत म्हणाले.

संजय राऊत यांचा मोठा आरोप

हा निकाल लागलेला नाही तर तो लावून घेतलेला आहे, असा मोठा आरोप खा. संजय राऊत यांनी केला. लाडकी बहिण योजनेमुळे हा निकाल लागला, असंही म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातील निकालांवर गौतम अदानी यांचं लक्ष होतं. अदानी यांचे अटक वाँरंट निघाल्यावर हे चित्र बदलले, असा आरोपही राऊत यांनी केला. अदानी व एकनाथ शिंदे हे एकच आहेत. या निवडणुकीत पैशाचा मोठा पाऊस पडल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+