कोकण, घाटमाथ्यावर कोसळणार! राज्यात पाऊस थोडी घेणार विश्रांती, जाणून घ्या आजचे हवामान, पावसाचा अंदाज
Maharashtra Weather News : घाटमाथ्यावर आणि कोकणात आज पाऊस जोरदार कोसळणार असून राज्यात इतरत्र मात्र पाऊस थोडी विश्रांती घेणार आहे, त्यामुळे पुणेकरांसह राज्यातील लोकांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांत पावसाने राज्याला चांगलेच झोडपले. पुण्यात तर अतिवृष्टीने कहर केला. तिथल्या जनजीवनावरही परिणाम झाला, पण आता पाऊस थोडी विश्रांती घेणार आहे. त्यामुळे अंशत का होईना पण हा दिलासा आहे.

पावसाची विश्रांती, थोडासा दिलासा
जूनमध्ये चातकासारखी वाट पाहाव्या लागणाऱ्या पावसाने जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसात दमदार हजेरी लावली. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. काही ठिकाणी धरणाचे दरवाजेही उघडावे लागले तर काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळीही ओलांडली होती. आता यातून थोडासा दिलासा मिळणार आहे.
या भागात जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
पुण्यात पूरस्थिती, आज पुन्हा पाऊस पडणार
मुसळधार पावसामुळे पुण्यात पूरसदृश परिस्थिती, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आणि पुण्यातील घाट भागात निर्जन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला.
मुंबईत पावसाची स्थिती काय?
आज मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईकरांना दिवसभर शहर आणि उपनगरात मध्यम पावसाची अपेक्षा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज
हवामान विभागानं आज कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हलका पाऊसपडेल असा अंदाज वर्तवला आहे. पण इतरत्र मात्र पाऊस थोडी विश्रांती घेईल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
उत्तर भारतात पावसाचा कहर
उत्तर आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने कहर केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि केरळमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी, अचानक पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications