Maharashtra Rain : 'इतके' दिवस पाऊस पाठ सोडणार नाही! मुंबई-ठाणे, नाशिकला आज 'ऑरेंज अलर्ट'
Maharashtra Rain Update : राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून मराठवाड्यात पावसाने कहर केला आहे, नांदेडला अद्यापही पुराचा धोका असून त्या पाठोपाठ परभणी, लातूर, धाराशीव आणि सोलापूरालाही पुराचा फटका बसला आहे. आज राज्यातील मुंबई ठाणे नाशिक पालघर येथे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवस आणखी पाऊस पडेल कोकण, गोव्यात चार दिवस पाऊस पडण्यीची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबई हवामान विभागाचा अंदाज
मुंबई हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
Thunderstorm accompanied with lightning, heavy to very heavy rain with extremely heavy at isolated places with gusty winds 40-50 kmph very likely to occur at isolated places in the districts of North Konkan and in ghats area of North Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 28, 2025
कोकण गोव्यात चार दिवस पावसाचेच...
पुणे हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण गोव्यात पुढील चार ते पाच दिवस तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विदर्भात दोन दिवस पाऊस
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे, तर नांदेड जिल्ह्याला कालपासून पुराचा धोका आहे, अशातच मराठवाड्यात आणि विदर्भात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघर नाशिकला ऑरेंज अलर्ट
पालघर , ठाणे, मुंबई , रायगड , नाशिक व नाशिकचा घाट विभाग, पुण्याचा घाट विभाग या ठिकाणी आज तुरळक ठिकाणी तसेच सातारच्या घाट विभागात अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि आजुबाजूचा परिसर
पुणे व आसपासच्या परिसरातील हवामान अंदाज पाहता आज पुण्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज घाट विभागात ऑरेंज अलर्ट पुणे हवामान विभागाने दिला आहे.
का पडतोय 'एवढा' पाऊस?
पश्चिम विदर्भ आणि लगतच्या भागावर तीव्र कमी दाबाच्या रुपांतर क्षेत्राचे रुपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे आणि ते पश्चिम विदर्भ आणि राज्यातील लगतच्या भागावर आहे. तर एक कमी दाबाचे द्रोणीय क्षेत्र मध्य बंगाल उपसागरापासून दक्षिण भागातून छत्तीसगढ, आंध्रप्रदेश किनारपट्टीवरुन जात आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे.
हेही वाचा : Maharashtra Rain Alert दक्षता बाळगा! अजून 'इतके' दिवस जोरदार पाऊस होणार, हवामान विभागाचा गंभीर इशारा












Click it and Unblock the Notifications