Maharashtra Rain Alert दक्षता बाळगा! अजून 'इतके' दिवस जोरदार पाऊस होणार, हवामान विभागाचा गंभीर इशारा
Maharashtra Rain Alert : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (IMD) कडून प्राप्त माहितीनुसार, राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (SEOC), मंत्रालय, मुंबईने दिनांक २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढण्याचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आणि प्रशासनाने अतिदक्षता (Red Alert) बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण-गोवा मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विभागवार पावसाचा अंदाज आणि धोक्याचा प्रकार संभाव्य परिणाम
- कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापक पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून शेतीच्या मोठ्या नुकसानाची शक्यता आहे, नदीकाठच्या रहिवाशांना पुराचा धोका कायम आहे.
- मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून शहरी पूर येण्याची शक्यता आहे.
- घाट व लहान नद्यांचा परिसरात दरडी कोसळण्याची शक्यता. पुराचा धोक्याची शक्यता असून नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (SEOC) परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.
- प्रशासनाच्या पूर्व तयारी आणि उपाययोजना तीव्र पावसाच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने खालील तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
- जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवावेत.
- शहरातील पूर तयारी म्हणून सखल भागांमध्ये पाणी उपसा पंप (Water Pumps) तैनात करावेत. धोकादायक आणि जुन्या इमारतींवर आपत्कालीन उपाययोजना कराव्यात अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
- वीज आणि रस्ते दुरुस्तीसाठी आवश्यक पथके, साखळी आरे (Chain Saw) आणि फीडर संरक्षण युनिट्स तत्काळ तैनात करावेत अशा सुचना देण्यात आल्या आहेत तसेच कोकण आणि वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणांच्या पाण्याच्या पातळीचा दैनंदिन आढावा घ्यावा हेही सांगण्यात आले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
- पावसाची तीव्रता लक्षात घेता, नागरिकांनी खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे:
- केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवून त्याचे पालन करावे.
- धोकादायक किंवा पूरप्रवण क्षेत्रात जाणे पूर्णपणे टाळावे.
- वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे.
- पुरापासून बचावासाठी आवश्यक अत्यावश्यक बाबींची काळजी घ्यावी.
- पूर परिस्थितीत स्थानिक निवारा केंद्राचे (Shelter) सहाय्य घ्यावे.
- पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे.
- नदी-नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असताना, रस्ता ओलांडू नये.
- अफवांवर विश्वास ठेवू नये.
जिल्हा आणि राज्यस्तरीय आपत्कालीन संपर्क क्रमांक
जिल्हा - संपर्क क्रमांक
- धाराशीव ०२४७२-२२७३०१
- लातूर ०२३८२ २२०२०४
- सोलापूर ०२१७-२७३१०१२
- रायगड ८२७५१५२३६३
- बीड ०२४४२-२९९२९९
- रत्नागिरी ७०५७२२२३३
- नगर २४१-२३२३८४४
- पालघर ०२५२५ २९७४७४
- परभणी ०२४५२-२२६४००
- सिंधुदुर्ग ०२३६२ २२८८४७
- नांदेड ०२४६२-२३५०७७
- ठाणे ९३७२३३८८२७
- पुणे ९३७०९६००६१
- सातारा ०२१६२ २३२३४९
मुंबई शहर/उपनगर - १९१६ / ०२२ ६९४०३३४४ -
राज्यस्तरीय कार्यकेंद्र - ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ९३२१५८७१४३
Thunderstorm accompanied with lightning, heavy to very heavy rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan- Goa Marathwada and Ghats area of Madhya-Maharashtra .
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 27, 2025












Click it and Unblock the Notifications